Ticker

6/recent/ticker-posts

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इब्राहिमपूर येथील लसीकरणाला नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद.



नारायण शिरोळकर (चंदगड प्रतिनीधी)
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इब्राहिमपूर येथील लसीकरणाला नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद.


केंद्र आणि राज्यशासनाच्या दिशानिर्देशानुसार चंदगड तालुक्यात आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. ४५ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा कार्यक्रम प्रशासनाने हाती घेतला असून विविध आरोग्य उपकेंद्रावरती लसीकरण योजना राबवून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण पुर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस असून त्याचाच भाग म्हणून इब्राहिमपूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर देखील लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.ज्याला इब्राहिमपूर सह गवसे, कानडी, बुझवडे या गावातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून एकाच दिवसात तब्बल ३१७  लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात अआले असल्याची माहिती इब्राहिमपूर प्राथमिक उपकेंद्राच्या वतीने देण्यात आली आहे ज्यापैकी १६० इब्राहिमपूर ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला तर गवसे येथील १००, बुझवडे येथील ४९, कानडी-पोवाचीवाडी येथील ८ नागरीकांनी या लसीकरणाचा लाभ घेतला.
अडकूर येथील आरोग्य आधिकारी क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आरोग्य सेविका सविता गुरव, एस.डी. नाईक आणि आशा सेविका शिल्पा मांग यांच्या टीमने लसीकरण मोहीम पार पाडली. यावेळी इब्राहिमपूर ग्रामपंचायतीचे सरपंच निळकंठ देसाई यांच्या वतीने पुष्पगुच्छ देवून लसीकरणासाठी उपस्थित आरोग्य विभागाच्या प्रतिनीधींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना सरपंच निळकंठ देसाई ग्रामस्थांनी लसीकरणाला दिलेल्या प्रतिसादाबाबत समाधान व्यक्त केले तसेच तालुक्यातील सर्व उपकेंद्रांवर लस उपलब्ध करून दिली जात असून नागरिकांनी कोणताही गैरसमज न करता लसीकरण करून घेऊन स्वतः सुरक्षित राहावे. कुठल्याही अफवांना बळी पडू नये असे अवाहन त्यांनी याप्रसंगी बोलताना केले.

Post a Comment

0 Comments