Ticker

6/recent/ticker-posts

पिरळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.

पिरळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.

प्रतिनिधी/ रोहन कांबळे.


     राधानगरी तालुक्यातील पिरळ येथील आधार फौंडेशन यांच्याकडून आज बुधवार १४एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

[रक्तदान करताना माजी सभापती दिलीप कांबळे]

     सध्या देश्यामध्ये व राज्यामध्ये असलेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी अनेक सामाजिक संस्था त्याचबरोबर फाउंडेशन रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याची जाणीव करून देत आहे व देशाला आपत्कालीन स्थितीमध्ये रक्ताचा पुरवठा करण्यासाठी शिबिराचे आयोजन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनमित्त येथील आधार फाऊंडेशन कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान येथे समाज मंदिरामध्ये सकाळी १०ते ३या वेळेत पार पडले. पंचक्रोशीतील लोकांनी या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिरामध्ये १३० raktdatyaniरक्तदान केले.
     
     
 यावेळी या फाऊंडेशन'चे संस्थापक अध्यक्ष व राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य  दिलीप कांबळे, पिरळ गावचे सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच फाऊंडेशनचे अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments