शिरोली दुमाला प्राथमिक केंद्रात आरोग्य सेविका यांची पिळवनूक ?
बरेच वेळा वरिष्ठा कडून आपल्या सहकार्याना नाहक त्रास सहन करावा लागतो . कित्येकदा तर यात बरेजन आपला जीव गमवतात अशा बातम्या आपण वाचत असतो आणि अलीकडेच दीपाली चव्हाण या वन रक्षक अधिकारी महिलेने वरिष्ठाच्या त्रासाला कंटाळून आपला जीव दिला नि पून्हा एकदा या प्रश्नाने आपले डोके वर काढले आहे .
शिरोली आरोग्य केंद्रात अशिच एक घटना घडली आहे ज्या मध्ये महिला कर्मचारी यांनी आपल्या आरोग्य अधिकारी यांच्यावर आरोप केले आहेत की त्यांना कामाच्या ठिकाणी त्यांना अपमान होईल असे बोलणे तसेच जाती विषयक दृष्टिकोन ठेऊन काही जणांना खुश करण्यासाठी २४ तास शिप्ट करण्यास सांगणे तसें न केल्यास राहणाऱ्या खोल्या खाली करण्यासाठी रात्री अपरात्री फोन करणे आणि काही जाब विचारायचा म्हणले तर आमदार वैगेरे लोकांना फोन करून दमदाटी करण्यास सांगणे .
स्वतः एक अधिकारी असून खालच्या पातळीवर येऊन शिव्या शाप देणे प्रकार घडल्याचे सांगण्यात आले .
अधिकारी यांना या संदर्भात विचारले असता त्यांच्या म्हणण्या प्रमाणे कर्मचारी सेविका आपले ऑडर पाळत नाहीत आपण कोणत्याही प्रकारे आरोग्य सेविकाना त्रास होईल असे वर्तन केले नाही कि कुणाच्या हि दबावाखली काम केले नाही मला जे योग्य वाटले आणि जे योग्य होते ते केले असून केलेल्या अरोपात कोणते हि तत्य नाही आपण कोणाच्याहि मर्जी साठी कामं करत नाही मला सर्व स्टाफ समान असून मी प्रत्येकाला सामावून घेऊन काम करण्याचा प्रयत्न करत असते असे त्या म्हणाल्या .
0 Comments