Ticker

6/recent/ticker-posts

बिजली मल्ल माजी आमदार पैलवान स्वर्गीय संभाजीराव( आप्पा) पवार यांच्या स्मरणार्थ सांगली शहरात पाणपोई उभारण्यात आली..!

प्रतिनिधी :- 
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा.

      बिजली मल्ल माजी आमदार पैलवान स्वर्गीय संभाजीराव( आप्पा) पवार यांच्या स्मरणार्थ हॉटेल चालक मालक असोसिएशन जिल्हा सांगली यांच्या मान्यतेने सौरभ उद्योग समूह यांच्या वतीने सांगली शहरात पाणपोई उभारण्यात आली. याप्रसंगी आपले हॉटेल व्यवसायिक पाटील वाड्याचे मालक व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपमहापौर श्री उमेश पाटील साहेब यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी श्री रमेश कोटीभास्कर; बाळासाहेब मोहिते सर; पंडित पाटील; सुहास पाटील; कैलास सूर्यवंशी; डॉक्टर शुभम जाधव; व तसेच हॉटेल चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष श्री शैलेश भाऊ पवार व तसेच सौरभ उद्योगसमूहाचे सौरभ पवार व तालमीतील सर्व पहिलवान उपस्थित होते. उपमहापौरांनी या उद्घाटन प्रसंगी आप्पांच्या जुन्या आठवणी सांगून सर्वांना गहिवरून आले. आप्पा हे व्यक्तिमत्व परत होणे नाही. आप्पांची कारकीर्द इतिहास म्हणून जपली जाईल. अशी ग्वाही दिली.

Post a Comment

0 Comments