Ticker

6/recent/ticker-posts

महिला स्वावलंबी होण्यासाठी शासनाच्या योजना ग्रामपंचायतीच्या वतीने सक्षमपणे राबवणार : सरपंच पूजा मोरे

महिला स्वावलंबी होण्यासाठी शासनाच्या योजना 
ग्रामपंचायतीच्या वतीने सक्षमपणे राबवणार : सरपंच पूजा मोरे

राधानगरी लाईव्ह
विजय कांबळे


  बेलवळे बु ( प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील व्हन्नूर येथील श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार होते.या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना सरपंच पूजा मोरे म्हणाल्या की,ब्युटी पार्लर, शिवणकला,पाककला यासारख्या लघुउद्योगातून महिला सक्षम बनू शकतात.त्यामुळे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाच्या योजना ग्रामपंचायती च्या वतीने सक्षमपणे राबवणार असल्याचे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून कर्तबगार महिलांच्या भिंतीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले.तसेच या महिला दिनानिमित्त शालेय मुलींना सॅनिटरी,नॅपकिन वितरण करण्यात आले.

यावेळी उपसरपंच मंगल कोकणे, सुजाता पाटील,रूपाताई पाटील, तेजस्विनी कांबळे,सुजाता माने, कल्पना कदम,जयश्री संकपाळ तसेच प्रशालेच्या सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे स्वागत पोवार ए.ए यांनी केले तर प्रास्ताविक मोरे एम.जी.यांनी यांनी केले. सूत्रसंचालन यादव एन.सी.यांनी केले व कार्यक्रमाचे आभार इंगवले आर.व्ही यांनी मानले.

Post a Comment

0 Comments