सरावणे फौंडेशन आणि रेणुताई पोवार यांनी दिव्यांग खेळाडूंना प्रवासासाठी मोफत बस दिली.
सुनिल पाटील
गोळीबार मैदान, महाड नाका, रत्नागिरी येथे होणाऱ्या नगराध्यक्ष चषक २०२१ या स्पर्धेसाठी दि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन ऑफ डिसेंबल्ड, कोल्हापूर संघ आज दिनांक ०६ मार्च, २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता रवाना झाली.
यावेळी दिव्यांग खेळाडूंना कै. स्व. अभिजित उर्फ सरदार सरावणे (भाऊ) युवा फोंडेशन, राधानगरी संस्थापक डॉ. विलासराव सरावणे फोंडेशनचे अध्यक्ष सतीश पाटील व सामाजिक कार्यकर्त्या रेणू पोवार व अर्जुन पोवार
यांनी स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी मोफत बस सेवा सह खाऊ उपलब्ध करून दिला.
तसेच सुजित जाधव ,अजिंक्य जाधव,आकाश पाटील, सागर जाधव यांनीही खेळाडूंना शुभेच्छा आणि खाऊ दिला.
यावेळी उपस्थित संस्थेचे सचिव नारायण मडके (जिल्हा अध्यक्ष, दिव्यांग सेना, कोल्हापूर) आणि संस्थेचे मार्गदर्शक, आधारस्तंभ अतुल धवनडे यांनी देणगीदारांचे आभार मानले.
कोल्हापूर संघात १५ खेळाडू व्यवस्थापक, मार्गदर्शक म्हणून अतुल धनवडे, टीम मॅनेजर म्हणून नारायण मडके यांची निवद करण्यात आली आहे.
0 Comments