Ticker

6/recent/ticker-posts

राशिवडे मध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा

राशिवडे मध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा

 एका महिला कलाकाराला दिली सरपंच पदाची संधी 

राधानगरी लाईव्ह/प्रतिनिधी

८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राशिवडे ग्रामपंचायतीचे सरपंच  कृष्णात पोवार यांनी महिला सक्षमीकरणासाठी राशिवडे च्या महिला कलाकार अनिता महादेव मगदूम यांना सरपंच पदाची संधी देऊन आदर्शाचा वसा जोपासला आहे. यावेळी आरटीओ च्या हेडकॉन्स्टेबल हेमा पाटील, कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या रेणू पोवार ,डेप्युटी सरपंच अनिल ऊर्फ शिवाजी वाडकर, ग्रामपंचायतीचे सदस्या  सौ धनश्री बिल्ले ,स्वप्नाली पाटील , आंबुबाई चांदणे, सौ संगीता मगदूम ,माजी डेप्युटी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ जयसिंग पाटील, ग्रामसेवक आरडे, या बरोबरच सामाजिक कार्यकर्त्या वर्षा शिंदे व्यासपीठावर उपस्थित होत्या. या वेळी कोरोनाच्या कालावधीत गावासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या आणि अविरत सेवा करणार्‍या ग्रामपंचायतीच्या महिला कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच एक व दोन मुलींच्या  नंतर  कुटुंब शस्त्रक्रिया करणारे दाम्पत्य कृष्णात लाड यांना ताराराणी  स्मार्ट कार्ड देऊन  सत्कार करण्यात आला.

 पुरुष व स्त्री ही संसाराची दोन चाकी असून दोघांनीही  आयुष्यभर सन्मानाने जगले पाहिजेत व भावी पिढीसाठी आदर्श निर्माण केला पाहिजे असे मत वर्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले .तर एक दिवसासाठी सरपंच केलेल्या अनिता मगदूम यांनी सरपंच कृष्णात पोवार यांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केले .यावेळी सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले .दीपप्रज्वलन ग्रामपंचायतीच्या सदस्या  स्वप्नाली पाटील , आंबुबाई चांदणे, धनश्री बिल्ले ,संगीता मगदूम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. आजच्या आधुनिक जगात स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांचा सन्मान राखत आयुष्यात सुखाची बीजे पेरावीत .एक दिवसाचा महिलादिन साजरा न होता प्रत्येक दिवशी महिलांचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या  कार्यकर्तृत्वाचा सुगंध दरवळावा यासाठी पुरुषांनी हातभार लावावा असे मत शिवम संस्थेचे अध्यक्ष दिगंबर टिपुगडे यांनी व्यक्त केले . यावेळी जिल्‍हा  कलाकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रकाश सुतार, अंगणवाडीच्या सेविका व मदतनीस तसेच  ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. आभार ग्रामसेवक आरडे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments