Ticker

6/recent/ticker-posts

आठ दिवसात पुनर्वसन न झाल्यास नागनवाडी प्रकल्पाचे काम बंद पाडणार ,

आठ दिवसात पुनर्वसन न झाल्यास नागनवाडी प्रकल्पाचे काम बंद पाडणार ,

नागनवाडी प्रकल्पग्रस्तांचा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यानांइशारा इशारा
  
  बाळासाहेब बोडके (भुदरगड प्रतिनिधी)

  येत्या आठ दिवसात नागणवाडी बारावी प्रकल्पाचे उर्वरित पुनर्वसन आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाची पूर्तता न झाल्यास 28 तारखेपासून धरणाचे काम बंद करण्याचा इशारा नागणवाडी प्रकल्पग्रस्त कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे निवेदनात म्हटले आहे की मागील महिन्यात 15 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्राम विकास मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी पुनर्वसन अधिकारी आणि धरण ग्रस्त शेतकरी यांची पुनर्वसनासंदर्भात आढावा बैठक झाली या बैठकीत संकलन दुरुस्ती करावी जमीन वाटप करणे आर्थिक पॅकेज वाटप करणे धरणाचा नियत दिनांक निश्चित करणे जमीन वाटप केलेल्या प्रकल्पग्रस्तांना जिल्ह्यात कुठेही जमीन उपलब्ध करून देणे अशा मागण्या प्रकल्पग्रस्त कमिटीने घेतल्या होत्या या बैठकीत नामदार मुश्रीफ यांनी सर्व अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्त यांच्या प्रश्न निहाय यादी घेऊन महिनाभरात पुनर्वसन व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची पूर्तता करावी अशा सूचना दिल्या होत्या मात्र या महिनाभरात अधिकाऱ्यांनी एकाही मागणीची सोडून केलेली नाही त्याचबरोबर पुनर्वसन कार्यालयाकडून नातू आणि सून यांचा कुटुंबामध्ये समावेश करता येत नाही असे सांगून काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची अर्ज निकाली काढण्यात आले आहेत मात्र या प्रकल्पातील 95 टक्के संकरण दुरुस्तीमध्ये नव्हतो आणि सून यांचा कुटुंबामध्ये समावेश केला असून उर्वरित पाच टक्के शेतकऱ्यावर हा अन्याय का केवळ 10 ते 12 प्रकल्पग्रस्तांची संकलन दुरुस्ती शिल्लक आहे ती दुरुस्ती करून मिळावी आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा असताना पुनर्वसन न करता धरणाचे काम सुरू आहे आमचा धरणाला विरोध नाही मात्र राहिलेल्या लोकांचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे अशी आमची मागणी असून येत्या आठ दिवसात आमच्या संपूर्ण मागण्या वासन न देता पूर्ण झाल्या न झाल्यास नाईलाजाने 28 पासून धरणाचे काम बंद करण्याचा तसेच आंदोलन करण्याचा निर्णय प्रकल्पग्रस्त कमिटीने घेतलेला आहे असे निवेदनात म्हटले आहे यावेळी धनाजी पाटील ,एस आर फराकटे अजित इंदुलकर, विक्रम पाटील, विठ्ठल फराकटे आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments