बेलवळे बु प्रतिनिधी
व्हन्नूर ता.कागल येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार होते. ते पुढे म्हणाले,विज्ञान शाप की वरदान किंवा फायदा की नुकसान अशा दोन्ही बाजू समजावून घेणे आवश्यक आहे.कुठल्याही गोष्टी चा अतिरेक करणे म्हणजे नुकसानाला आमंत्रण देण्यासारखे असते तसेच विज्ञान बाबतही झाले आहे,असे प्रतिपादन त्यांनी केले.त्याचबरोबर त्यांनीअंधश्रद्धा निर्मूलन यावर आधारित अनेक प्रयोग दाखवून विद्यार्थ्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे स्वागत विज्ञान विभागप्रमुख एन.सी.यादव यांनी केले. सूत्रसंचालन एस.के.तिकोडे यांनी केले तर आभार ए.ए.पोवार यांनी मानले.
0 Comments