Ticker

6/recent/ticker-posts

नॅशनल ब्लॅक पँथर पक्षाचे महाराष्ट्र निरीक्षक जीवनसिंग यांची सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर येथे सदिच्छा भेट

प्रतिनिधी कोल्हापूर :- 
येथे दि. २३/०३/२०२१ रोजी नॅशनल ब्लॅक पँथर पक्षाचे महाराष्ट्र निरीक्षक मा. जीवनसिंग यांची सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर येथे सदिच्छा भेट दिली. या वेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मा. विशाल लोंढे स्वतः उपस्तीत होते. सध्या विदारक झालेल्या समजाला फक्त उदरनिर्वाह उपयोगाचा नसून तो प्रत्येक व्यक्तीला स्वतः साठी आणि परिणामी तो ज्या समाजात जन्मला आहे त्या सामाजिक निष्टेसाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची आणि सामाजिक जाणिवेची गरज व्यक्त केली, तसेच  मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती तसेच मागासवर्गीयांना मिळणाऱ्या उच्छ शिक्षणाचे नियोजन आणि आयोजन तसेच त्या साठी लागणारी सर्व शिष्यवृत्ती वितरण संदर्भात आढावा घेतला तसेच शासकीय पातळीवर येणाऱ्या आडचनी समजून घेऊन त्या संदर्भात जिल्हा समाजकल्याण आणि नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी असे मिळून संयुक्त विद्यमाने असलेल्या शासकीय योजना कश्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवल्या जातील ह्या बद्दल तब्बल तीन तास चर्चा केली. त्याच्यातून असे निदर्शनात आले की वरिस्ट स्तरावरून योजना विद्यार्थ्यांपर्यंत तसेच महिला सबलीकरण किंव्हा सुशिक्षित बेरोजगार यांना त्या परिपुर्ण मिळत नाहीत किंव्हा त्या सोई सुविधा उपलब्ध आहेत ह्या बद्दल माहिती नाही असे अनेक कारणे असल्याने त्या योजना फक्त कागदावरच राहतात आणि ज्यांना त्याचा लाभ घ्यावा वाटतो त्यांना तांत्रिक बाबींच्या निकषावर त्या सुविधेचा लाभ घेता येत नाही, असे प्रामुख्याने लक्षात आले. तसेच तांडा सुरक्षा सोई सुविधा यांच्या बद्दलही सकारात्मक चर्चा झाल्या, तरी ह्या बद्दल सामाजिक आणि तांत्रिक दुरावा दूर करून स्वतः जातीने सुधारणा करण्याची व विविध उपाययोजना सर्वच पातळीवर प्रयत्न करण्याचे अश्वासन सहाय्यक आयुक्त लोंढे यांनी देले .
 यावेळी पक्षाचे महाराष्ट्र निरिक्षक जीवनसिंग, जिल्हा आरोग्य अध्यक्ष अभिजित आवळे, जिल्हा प्रभारी स्नेहा सरनाईक, तथा महाराष्ट्र निरीक्षक यांचे स्वीय्य सहाय्यक नवनाथ कलढोण, आणि पदाधिकारी अमित मोहिते आदी शिष्ट मंडळ चर्चासत्रात उपस्थिति होते.

Post a Comment

0 Comments