कोल्हापूर
होळी लहान करा, पोळी दान करा ,शेनि स्मशानभूमीमध्ये दान करा, या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
इंडियन मार्शल आर्ट थांग -ता असोसिएशन च्या वतीने पर्यावरणाचे रक्षण केलेत, तर पर्यावरण तुमचे रक्षण करेल हा उद्देश घेऊन होळी करा लहान, पोळी करा दान, शेणी करा स्मशानभूमीस दान’ असे समाज प्रबोधन जनजागृती रॅली 27 मार्च 2021 रोजी सकाळी महावीर गार्डन, कलेक्टर ऑफिस ते रंकाळा येथे युवक खेळाडूंनी " प्रदूषण करू नका पृथ्वीला कष्ट देऊ नका", "प्रदूषणाचा धोका अनुयुद्धापेक्षा मोठा"," प्रदूषण हटवा पर्यावरण वाचवा", "होळी लहान करा पोळी दान करा", "होळी लहान करा पर्यावरणाचे रक्षण करा", "होळी लहान करा शेनी दान करा ", "नको मोठी होळी आरोग्यास होईल हानी", "होळी लहान करा प्रदूषण टाळा" असे इत्यादी फलक घेऊन सायकल रॅली काढली तर लहान गटातील मुला-मुलींनी 28 मार्च ,2021 रोजी शाहूपुरी परिसर जनजागृती फलक घेऊन सायकल रॅली काढण्यात आली. तर संघटनेतर्फे 26 मार्च 2021 रोजी कोपार्डे येथे अनिल शेंडगे (आंतरराष्ट्रीय खेळाडू), भुषण पाटील (डे सरपंच), अरुण, पाटील, सुहास पाटील, सिंकदर कांबळे( ग्रामपंचायत सदस्य )यांनी स्मशानभूमीस शेणी दान करून विधायक उपक्रमाची जोड दिली.होळी लहान, शेणी दान महान’ चा संदेश देत नागरिकांनी सणाला सामाजिक किनारची जोड दिली. शिवाय ‘पोळी दान’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.होळी रे होळी…, पुरणाची पोळी,असे म्हणत सर्वच ठिकाणी साधेपणा मध्ये होळी हा सण साजरा केला.यामध्ये दरवर्षी करोडो पोळ्यांची या होळीला नैवेद्याच्या नावाखाली राख होते. मात्र हीच पोळी गरजूंना दिली तर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे आनंदायीच असेल. याच धर्तीवर होळी लहान करा व पोळी दान करा शेनी दान करा हा उपक्रम संघटने तर्फे राबविण्यात आला. या उपक्रमाचे संयोजक सतीश वडणगेकर सचिव ,ऋत्विका शिंदे, महादेव वडणगेकर, तसेच महावीर धुलधर सर (महासचिव) यांचे प्रोत्साहन मिळाले.
0 Comments