Ticker

6/recent/ticker-posts

करनूर मधील पानंद दुरुस्ती कामास सुरुवात

करनूर मधील पानंद दुरुस्ती कामास सुरुवात

राधानगरी लाईव्ह
 कागल/प्रतिनिधी

     करनूर ता.कागल येथे महाराजस्व अभियान महसूल लोकजत्रा अंतग॔त गावातील पानंदी खुल्या करण्याच्या कामास प्रारंभ झाला. आहे. या कामास कोरे पानंद पासून शुभारंभ करण्यात आला. तहसीलदार शिल्पा ठोकडे  व गटविकास अधिकारी सुशिल संसारे यांच्या हस्ते सुरुवात झाली.

                     यावेळी बोलताना कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, कोरे पानंद बर्याच वर्षापासून   अतिक्रमणाच्या विळख्यात होती.त्यामुळे शेतक-यांना शेतीच्या कामासाठी अतिशय अडचणी येत होत्या.त्यांच्या मागणीनुसार पानंद रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व शेतक-यानी सहकार्याची भावना ठेवून करनूर हे गाव पानंद अतिक्रमण मुक्त करावे.असे आवाहन करून मी उदघाटना साठी आलो नसून पानंदी मुक्त करण्यासाठी आलो आहे. या कामी कोण अडवणूक केलेस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.असे त्या म्हणाल्या.  
               सदर पानंदिसाठी गाव कामगार तलाठी संदीप पवार व कोतवाल राकेश कांबळे यांनी परिश्रम घेतले.यावेळी मंडल  अधिकारी अरुण कांबळे, तलाठी संदीप पोवार ,ग्रामसेवीका योजना जंगम, सरपंच सौ.कविता घाटगे, उपसरपंच प्रविणकुमार कांबळे, सदस्य तानाजी भोसले, कुमार पाटील, रोहन पाटील, रेश्मा शेख,उल्फत शेख,संगिता जगदाळे तसेच तातोबा चव्हाण, महंमद शेख,इम्रान नायकवडी, रावसो चौगुले,जयसिंग घाटगे, संभाजी पाटील,भाऊसो नलवडे, राजू भोसले,वैभव आडके, अरविंद चौगुले,समीर शेख, राजमहद शेख,बाबुराव धनगर, अनिरुद्ध चौगुले,युवराज शिंदे, किरण घायतडक आदींसह कोरे पाानंदीतील सर्वशेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments