नारायण शिरोळकर (चंदगड प्रतिनीधी)
चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर येथील पावणाईदेवीची यात्रा कोरोनामुळे आवश्यक ती खबरदारी घेवून कोरोना संबंधी सर्व नियमांचे पालन करत साधेपणाने साजरी करण्यात आली. या यात्रेला पुणे, मुंबई येथुन चाकरमाणी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. यावर्षी मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने व प्रशासनास सहकार्य करण्याच्या दृष्टीने इब्राहिमपूर ग्रामस्थ यांच्या वतीने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
भाविकांनी सुरक्षित सामाजिक व शारीरिक अंतर राखून यात्रा साजरी केली यावेळी गर्दी होइल असे कार्यक्रम इब्राहिमपूर ग्रामपंचायतीकडून टाळण्यात आले होते. यात्रा ठिकाणी मिठाई आणि इतर दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आल्याने छोट्या व्यवसायिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. ठरावीक ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी यावेळी पार पाडण्यात आले. कोरोना पार्श्वभुमिवर प्रशासनाला सहकार्य करावे, यात्रा ठिकाणी गर्दी करू नये या युवा सरपंच निळकंठ देसाई यांनी केलेल्या अहवानाला ग्रामस्थ आणि भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
0 Comments