राधानगरी लाईव्ह
सुनिल पाटील
कंदलगांव:- देशासह राज्यात कोरोनामुळे अनेक सण उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले आहे. तसेच काही उत्सव हे रद्द देखील करण्यात आले आहे.
दरम्यान या महिन्यात महादेव श्रीशंकर यांचा महाशिवरात्र उत्सव येत असून या सणवार देखील कोरोनाचे सावट कायम आहे. नुकतेच कंदलगांव आणि परिसरातील रामलिंग देवालय येथील महाशिवरात्रीचा दि. ११ मार्च ते १२ मार्च या दोन दिवसांच्या काळात होणारी यात्रा करोनामुळे यंदा साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे आहे.
याबाबतची माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष एकनाथ गुरव यांनी दिली. कंदलगांव येथे दरवर्षी शिवरात्रीची यात्रा दोन दिवसांची असते आणि किमान हजार दोन हजार भाविक यात्रेला गर्दी करीत असतात.
तथापी सध्या करोनाने डोके वर काढले असल्याने या यात्रेवर नैसर्गिक संकट आले आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव व शासकीय निर्बंध लक्षात घेता यंदा ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे पोलीस पाटील दिपक कदम यांनी स्पष्ट केले. व्यापार्यांनी व विक्रेत्यांनी आपला खेळणी, प्रसाद, रहाटगाडगे, पाळणे किंवा इतर कोणताही माल विक्रीस आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शिवाय यात्रेच्या दुसर्या दिवशी होणारा महाप्रसाद देखील थोडक्यात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. फक्त शासकीय नियमांच्या अधीन राहून रामलिंग मंदिरातील विधीवत पूजाअर्चा व दर्शन उपलब्ध करून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले
यावेळी सरपंच अश्विनी गोरुले,पोलीस पाटील दिपक कदम, ग्रामसेवक तुकाराम मडवळ,देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, सदस्य राजाराम पाटील, शांताराम पाटील, दौलु पाटील, लक्ष्मण घुले, बाळु मांडवकर, गुंडू कदम,तानाजी गोरुले, वसंत,कांबळे,रामचंद्र कांबळे, धोंडीराम कांबळे, केरबा लाड,चंदर पाटील, दिनकर पाटील, सुभाष गोरुले,युवराज हारुगले तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments