Ticker

6/recent/ticker-posts

जत नगरी लवकरच कलानगरी होण्याच्या मार्गावर... !


प्रतिनिधी :-
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा
सांगली

*जत नगरी लवकरच कलानगरी होण्याच्या मार्गावर... !*
तूच माझं काळीज लवकरच झळकणार जत तालुका  हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो पण या तालुक्यात बऱ्याच कलाकारांच्या अंगी कलेचे सुप्त गुण आहेत हे मागील दोन वर्षापासून दिसून येत आहे दोन वर्षापूर्वी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज भोसले येथे आले असताना त्याने जत तालुक्यातील कलाकारांना आपली कला दाखविण्याची चांगली संधी आहे असे प्रतिपादन केले होते त्यावेळेपासून आज पर्यंत अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या वेब सिरीज मालिका गॅदरिंग आर्केस्ट्रा सात रंग के सपने सूनहरी यादें, गोप न प्रीतीच चांदण, आकर्षण, नाद घुंगरांचा, आभाळमाया, वैभव शाली जत, मार्केट आमचं चं अशा वेगळ्या कलाकृतीतून आपली कला प्रेक्षकांना दाखवून दिली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात जत नगरी लवकरच चित्रनगरी म्हणून ओळखली जाणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे भरारी पथक सदस्य श्री दिनकर पतंगे यांनी व्यक्त केले. तसेच श्री के मुत्तुराज हे जत तालुक्यातील रहिवाशी असून त्यांनी निर्मिती क्षेत्रात उतरून 'तूच माझं काळीज" हा मराठी चित्रपट तयार केलेला आहे. या चित्रपटाची कथा हृदयाला स्पर्श करणारी आहे आणि हा मराठी चित्रपट लवकरच पडद्यावर झळकणार असे मत श्री दिनकर पतंगे यांनी व्यक्त केले. मार्केट आमचं चं या वेब सेरीज पहिल्या बैठकीच्या वेळी बोलत होते या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नजीर भाई चट्टरकी, दिग्दर्शक के. अजितकुमार, रशीद मुलाणी सर, सपना मराठे, वर्षा सावंत पुकार औटे सर, अभिनेता सरताज नदाफ , रोहित पवार,कॅमेरामन अभिजीत पडोळकर, सहदेव माळी, राजेंद्र आरळी, मोहसीन मुल्ला, नजीर शेख इत्यादी कलाकार उपस्थित होते आज जत तालुक्यातील कलाकारांच्या मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक कलाकार मोठ्या उत्साहाने भाग घेत आहे त्यामुळे जत नगरी ही कलाकार नगरी झाल्याशिवाय राहणार नाही लवकरच चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघ राजे भोसले हे भेट देणार आहेत असे पतंगे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments