दि.२८/३/२१
प्रतिनिधि :- प्रमोद चिनके
शिक्षकसेनेच्या वतीने आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नागरिकांना आधार कार्ड चे नवीन करून देण्यासाठी पूर्ण जन्मतारीख, हरवकेले आधारकार्ड,खराब असलेले आधार कार्ड,नवीन आधार कार्ड या सर्व गोष्टींचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता.
गावातील नागरिकांचा सम्पूर्ण प्रतिसाद मिळाला .त्या मध्ये शिवसेना शिक्षक सेनेचे जिल्ह्याअध्यक्ष प्रा. भूषण भासार सर यांनी नियोजन करून ज्यांचे महापुरामुळे अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहेत अनेकांची कागदपत्रे खराब झाली आहेत काही गाहाळ झाली आहेत त्यामुळे त्यांना शासकीय कामात अडथळे येत आहेत म्हणून त्यांनी आधारकार्ड कॅम्प चे आयोजित केले आहे.
लवकरच पुनः रेशन कार्ड ,पॅनकार्ड,संदर्भात कॅम्प घेऊन नागरिकांना सुविधा देणार आहे.त्यांनी कोरोनासारख्या महामारीमुळे त्यांनी प्रत्येक घरी जाऊन कार्ड वाटप केले या कॅम्पसाठी शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी सरपंच उत्तम गावडे ,बी. टी. पाटील,प्रथमेश काटे, तेजस पवार,गणेश थोरात,अभिजित पाटील,सुभाष पाटील,पंकज गोसावी,सौरभ जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments