Ticker

6/recent/ticker-posts

नँशनल ब्लॅक पँथर चे महाराष्ट्र निरिक्षक जीवनसिंग यांची कोल्हापूर पालिकेच्या आरोग्य अधिकारी यांना भेट .

दिनांक :- 25/3/21
 . 

    को. शहर प्रतिनिधी :- 
महापालिकेतील सफाई कर्मचारी यांचे विविध प्रश्न घेऊन जीवनसिंग यांनी पालिकेला वेळोवेळी निवेदन देऊन वाचा फोडण्याच कामं केल आहे. याच संदर्भात  पालिकेन यावर काय काय भूमिका घेतली कोणत्या सुविधा आणि उपाय योजना केल्या याचा सखोल आढावा घेतला.
 लवकरचं पालिकेन जर कार्यवाही नाही केली तर कठोर भूमिका घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगारांसाठी आणि जनतेसाठी अवश्य ते मार्ग स्वीकारावे लागतील अशी भूमिका जीवनसिंग यांनी बोलून दाखवली. 
तसेच महापालिकेच्या अखत्यारीत असलेले दवाखाने मधील सावित्रीबाई फुले दवाखाना, पंचगंगा हॉस्पिटल, आसोलेशन हॉस्पिटल असे दवाखाने येतात. त्या पैकी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला आणि महापालिका प्रशासनाच्या महसुलात नेहमी सिंहाचा वाटा असलेला दवाखाना म्हणजे सावित्रीबाई फुले दवाखाना. त्या मद्ये दोन भाग आहेत एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे बाळंतिणींचा भाग आणि दुसरा म्हणजे सर्व नागरिकांसाठी सुविधेचा की जेथे रुग्णांवर शस्त्रक्रिया ही केल्या जातात. पण तेथे होणारा अनागोंदी कारभार चांगलाच चव्हाट्यावर आणला आणि त्याच्यावर प्रशासनाचे लक्ष्य वेधून तेथील कारभार सुव्यवस्थेत आणला. आणि गरोदर माता भगिनींना तसेच जनतेच्या सेवेततील भागांना न्याय मिळवून दिला. तरी ही चर्चा महापालिका आरोग्य अधिकारी मा. पोळ ह्यांचेसोबत केली. हा ऐतिहासिक बदल घडवून आणताना नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी चे महाराष्ट्र निरीक्षक जीवनसिंग प्रमुख भूमिका बजावत असताना सोबत पक्षाचे  आरोग्य अध्यक्ष अभिजित आवळे, प्रभारी स्नेहा सरनाईक आणि जीवनसिंग यांचे सस्वीय्य सहाय्यक नवनाथ कळढोण
सोबत होते. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ यांचे उपस्तीतीत त्यांचे कार्यालयात पार पडली.
 

Post a Comment

2 Comments