एरंडपे येथे लोकवस्तित असलेले विद्युत खांब धोकादायक ; कधीही होऊ शकतो मोठा धोका
बाळासाहेब बोडके
(भुदरगड प्रतिनिधी)
एरंडपे (ता.भुदरगड) येथील अनेक ठिकाणी लोकवस्तीत जीर्ण अवस्थेत असलेले ३० ते ३५ वर्षापूर्वीचे सिमेंटचे विद्युत खांब दोरखंड (ओढणी) नसल्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळू शकतात, शिवाय लहान मुलांची खेळण्याची जागा व रहदारी असल्यामुळे एखादी अनुसूचित घटना घडण्याची शक्यता आहे. तरी संबंधित विभागाने या विद्युत खांबाची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी एरंडपे शिवसेना युवा नेते श्रावण पाटील यांनी कडगाव महावितरणचे कार्यकारी अधिकारी विजय मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहेरोहित्रावरून वीजपुरवठा केला आहे त्या रोहित्रासाठी उभे केलेले सिमेंटचे खांब जीर्ण अवस्थेत असल्यामुळे केव्हाही पडतील अशा स्थितीत आहेत, गावामध्ये पावसाळ्यामध्ये खूप मोठया प्रमाणात वादळी वारा-पाऊस पडत असल्याने जीर्णअवस्थेत असलेले विद्युत खांब पडून एखाद्यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी या होणाऱ्या दुर्घटनेला महावितरण कंपनी जबाबदार असेल, या विधुत खांबांची प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक विद्युत खांबांना ओढणी (दोरखंड) लावून सुरक्षित विधुतपुरवठा करावा ,जेणेकरून धोका होणार नाही यावेळी एरंडपे शिवसैनिक लहू पाटील, योगेश पाटील, केरबा पोवार,रुपेश पाटील आदी उपस्थित होते.
0 Comments