Ticker

6/recent/ticker-posts

वासनोली ता भुदरगड येथील शेतात बेशुद्ध अढळलेल्या शेतमजुराच मृत्यू : मयत नितवडे येथील मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही

वासनोली ता भुदरगड येथील शेतात बेशुद्ध अढळलेल्या शेतमजुराच मृत्यू : मयत नितवडे येथील

मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही

गारगोटी प्रतिनिधी,
बाळासो बोडके


नितवडे ता भुदरगड येथील शेत मजूर अशोक गोविंदा गुरव (वय ३४) हा वासनोली ता भुदरगड येथील शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडला त्याला उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला .त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.याबाबत ची वर्दी अशोक लक्ष्मण राऊळ (रा मेघोली,ता भुदरगड )यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.
अधिक माहिती अशी नितवडे येथील शेतकरी अशोक गोविंदा गुरव हा शुक्रवारी(दि १९)रोजी दुस-याचे शेतात मजुरीसाठी गेला होता.तेथून तो कोणालाही काहीही न सांगता कोठेतरी निघून गेला होता. शुक्रवारी संध्याकाळी तो घरी परत न आल्याने सगळीकडे शोधाशोध केली पण तो सापडला नाही.शनिवारी(दि २०) रोजी सकाळपासून त्याचा शोध सुरू झाला.तो दुपारी १२.३० च्या सुमारास वासनोली, ता भुदरगड येथे रस्त्याच्या बाजुच्या शेतात अशक्त अवस्थेत बसलेला दिसून आला. त्याला औषधोपचारासाठी गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्याच्यावर औषधोपचार होण्यापुर्वीच तो मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.अधिक तपास भुदरगड पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments