Ticker

6/recent/ticker-posts

मुदाळ, वाघापुर, व्हणगुती ,श्रीनगर या चार गावात गव्यानी घातला धुमाकूळ.

 मुदाळ, वाघापुर, व्हणगुती ,श्रीनगर या चार गावात गव्यानी घातला धुमाकूळ.

बाळासाहेब बोडके ( भुदरगड प्रतिनिधि)

   - वाघापूर ,व्हणगुती, श्रीनगर, मुदाळ शिवारात चार गव्यानी धुडगूस घालत पिकांचे नुकसान केले आहे. अचानक गव्यांचा कळप दाखल झाल्याने शेतकऱ्यांचे मध्ये भीतीचे वातावरण आहे .गुरुवारी पहाटे ऊसतोडणी मजूर शेतकऱ्यांना व्हणगुती येथील सतीश चौगुले यांच्या मक्याच्या रानात गव्यांचा कळप पिकांची नासधूस करताना दिसला .
त्यांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी त्यांना दाद दिली नाही चार गवे वाघापूर परिसरात दाखल झाल्याचे समजताच लोकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली त्यामुळे बिथरलेल्या गवे सैरावैरा पळाले . व्हणगुतीच्या सरपंच मधुरा खटांगळे, पोलीस पाटील दत्तात्रय घाडगे ,अरुण पाटील ,यांनी लोकांना दक्षता घेण्यास सांगितले पण हूलडबाज शेतकरी गव्यांना घाबरवत होते सकाळी साडेनऊ वाजता गव्यानी मुदाळच्या  डोंगराच्या दिशेने धूम ठोकली  गव्यानी ऊस लावणीचे,, तसेच मका ,भुईमूग पिकाचे मोठे नुकसान केले आहे

Post a Comment

0 Comments