Ticker

6/recent/ticker-posts

खेबवडे,ता.करवीर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार.

नंदगाव प्रतिनिधी : सचिन चौगले

खेबवडे तालुका करवीर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सैनिकांचा सत्कार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. यानिमित्त खेबवडे गावचे सुपुत्र संजय कृष्णा बोगार यांचा सत्कार
करण्यात आला. संजय बोगार यांनी भारतीय सैन्या मध्ये 28 वर्षे सेवा केली आहे व ही सेवा करत असताना त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना विविध पदके देऊन सन्मानित करण्यात आले आहे .  खेबवडे ग्रामपंचायतीच्या  माध्यमातून जे सैन्यदलातुन सेवानिवृत्त होऊन गावी येतील त्यांचा सत्कार सन्मान करण्याची सुरवात आज या गावचे सुपुत्र सुभेदार संजय कृष्णा बोगार यांचा सन्मान करून सुरवात केली व  इथुन पुढील काळात जे कोनी सैन्यदलातील अधिकारी व सैनिक सेवानिवृत्त होतील त्यांचा सत्कार सन्मान करनार असल्याचे  उपसरपंच  सुयोग वाडकर यांनी सांगितले यावेळी सुभेदार प्रताप मगदूम, अक्षय पाटील, ग्रामपंचायत चे विठ्ठल पाटील, संदीप चौगुले हे उपस्थित होते,या उपक्रमांमुळे खेबवडे ग्रामपंचायतीचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments