Ticker

6/recent/ticker-posts

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आनुवंशिक विकारांचे निदान करणारे शिबीर उत्साहात,

पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आनुवंशिक विकारांचे निदान करणारे शिबीर उत्साहात,

राधानगरी लाईव्ह
कोल्हापूर प्रतिनिधी

 जागतिक महिला दिनानिमित्त महालक्ष्मी सखी मंच - समवेदना मेडिकल फौंडेशन - हिंद लॅब - नंदादीप नेत्रालयाचा उपक्रम .
  
   महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनाच सावट असतानाही सोशल डिस्टन्सिंग पाळून अनेक ठीकाणी महीला दीन साजरा करण्यात आले. या दिवशी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले परंतू सध्याच्या काळात आनुवंशिक आजारात वाढ होवून  थैलेसिमीया, हिमोफिलीया, कॅन्सर,थायराईड,टीवी अशा अनेक प्रकाराची बाळ जन्म घेतात आणि पुढे भविष्यात दुर्धर आजारा बरोबर सामना करावा लागतो, याला अटकाव घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आजम जमादार व त्यांच्या पत्नी जासमिन जमादार यांनी पुढाकार घेवून इतर तपासण्या बरोबर HBA2( ईलेक्ट्रोफोरसेस )ची तपासणी प्रथमच ठेवले.
   HBA2 ( ईलेक्ट्रोफोरसेस ) ही तपासणी अत्यंत गरजेची आहे व सार्वजनिक ठीकाणी याचे शिबीर राबविल्यास अशा अजारापासून आपला देश मुक्त होवू शकतो असे आवाहन समाजाला समवेदना फौंडेशनचे अध्यक्ष बर्कत पन्हाळकर यांनी केले.
  थायरॉईड, रक्तघटक तपासणी सह अनुवंशिक विकारांचे निदान करणाऱ्या इलेक्टरोफेरोसिस चाचण्या आणि नेत्र तपासणी शिबिराचा  पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच मोफत उपक्रम जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरात राबविण्यात आला. महालक्ष्मी सखी मंचच्या पुढाकाराने समवेदना मेडीकल फौंडेशन , हिंद लॅब आणि नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त सहभागाने साईक्स एक्सटेन्शन परिसरात हा उपक्रम झाला. आडीचशेहून अधिक महिला भगिनींनी या उपक्रमाचा लाभ घेतला. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विजय जाधव , महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कु. गायत्री राऊत , पाककलातज्ञ सौ.संगीता देवकर , हाजी अब्दूलमजिद जमादार ,सौ.हाजी दिलशाद जमादार , सामाजिक कार्यकर्ते संजय पटकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ झाला. महालक्ष्मी सखी मंचच्या अध्यक्षा सौ. जस्मिन जमादार , सामाजिक कार्यकर्ते आजम जमादार , झाकिरभाई जमादार, समवेदना फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बरकत पन्हाळकर,नंदादीप नेत्रालयाचे डॉ. शुभम चव्हाण ,महालॅबचे तुषार पाटील आणि सुरेश पाटील आणि श्रीमती छाया साळुंखे , दिपाली समुद्रे , स्मिता गायकवाड, रेखा राजगुरू , एजाज शिकलगार,  युवराज पाटील , आय्याज शेख , नवाब शेख, यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments