शिवसेने कडुन आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांच्या कडे मागणी
हातकणंगले प्रतिनिधी
निशांत यादव
प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी येथे तत्काळ अत्यावश्यक साहित्य पुरवावे व इमारतीची दुरुस्ती करावी - शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांची मागणी
हुपरी शहराची लोकसंख्या ७५ हजारांपेक्षा अधिक असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा पुरविली जाते. तसेच हुपरी परिसरातील रेंदाळ,यळगूड,जंगमवाडी या गावांतील नागरिकांना सदर आरोग्य केंद्राकडून उपकेंद्राद्वारे आरोग्य सेवा पुरविली जाते.
सद्यपरिस्थितीत हुपरी प्रा.आ.केंद्रात लागणाऱ्या अत्यावश्यक साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रुग्णांना समाधानकारक आरोग्य सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच साहित्यांअभावी रुग्णांना सी.पी.आर कोल्हापूर येथे पाठवावे लागते.
तसेच सदर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम होऊन ३४ वर्षे झाली आहेत. त्यामुळे येथील सर्वच इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तरी प्रा.आ.केंद्र हुपरी येथील साहित्यांचा तत्काळ पुरवठा व इमारतींची देखभाल दुरुस्ती हातात घ्यावी, अशी मागणी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मा.मुरलीधर जाधव यांनी शिष्टमंडळाद्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती मा.हंबीरराव पाटील यांच्याकडे केली.
यावेळी जि.प.शिक्षण सभापती प्रवीण यादव,हुपरी शहरप्रमुख अमोल देशपांडे, महिला आघाडी तालुका संघटिका सौ.उषा चौगुले,माजी विभागप्रमुख राजेंद्र पाटील,युवासेना हुपरी शहर अधिकारी भरत देसाई,महिला संघटिका सौ.मीना जाधव,रेंदाळ ग्रा.पं.सदस्य महेश कोरवी,संजय चौगुले उपस्थित होते.
0 Comments