कागल प्रतिनिधी
विजय कांबळे
दौलतराव निकम हे खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्याची वैचारिक दौलत,असे गौरवोद्गार आनंदराव भोसले यांनी केले काढले.स्वर्गीय दौलतराव निकम यांच्या 14 व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थासचिव यशवंतराव निकम होते. आप्पासाहेब खापणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आनंदराव भोसले पुढे म्हणाले, कागल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दौलतराव निकम यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांनी दिनदलित,उपेक्षित,गरीब लोक केंद्रबिंदू मानून अज्ञान,अंधश्रद्धा व दारिद्र्य निर्मूलनासाठी आयुष्य भर झगडले.यावेळी दौलतराव निकम यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार,जे.एन.सावंत यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक एस.बी.पाटील तर आभार खाडे.बी.बी यांनी मानले.
0 Comments