Ticker

6/recent/ticker-posts

बेलवळे बुद्रुकमधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविड 19 लसीकरण संपन्न.

बेलवळे बुद्रुकमधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविड 19 लसीकरण संपन्न
विजय कांबळे 
कागल प्रतिनिधी

कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविड 19 च्या  लसीकरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.सदर लसीकरणात 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच 45 ते 59 वर्षे वयोगटातील सहव्याधी लोकांना लसीकरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन कागल पंचायत समिती च्या उपसभापती अंजना सुतार यांच्या हस्ते झाले.या लसीकरणा साठी 398 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेले होते त्यापैकी 394 लोकांना लसीकरण करण्यात आले.तर 4 लोकांचे रजिस्ट्रेशन रिजेक्ट करण्यात आले.या लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.जांभळे व डॉ.हांजे उपस्थित होते. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे मंडप, पाण्याची, टेबल-खुर्ची यांची सोय करण्यात आली होती.यासाठी ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसेवक आर डी पाटील यांचे सहकार्य लाभले.हे लसीकरण सत्र निर्विघ्नपणे, यशवीरित्या पार पडले.

यावेळी गावचे सरपंच रोहिणी पाटील,उपसरपंच विठ्ठल पाटील,  ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील,अतुल पाटील,इतर सदस्य माजी सरपंच नारायण पाटील, उपस्थित होते.डाटा एन्ट्री ऑपरेटर भूषण कांबळे,रणदिवे सिस्टर काटकर सिस्टर, सुपरवाय झर खोत सिस्टर जोशी,के एस पाटील,एच.एस माने,प्रवीण कदम,राजश्री खिरुगडे, कमलादेवी काशीद,मेघा पाटील, सरिता पाटील,शुभांगी चांदणे, सुमन कांबळे ग्रामपंचायत कर्मचारी प्रियंका पाटील,निवास पाटील,महादजी पाटील,सचिन सुतार,उत्तम कांबळे इत्यादी लोकांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments