Ticker

6/recent/ticker-posts

दैवज्ञ बोर्डिंग मंगळवार पेठ या ठिकाणी भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात कोल्हापूर जिल्हा सुरक्षारक्षक* *पदाधिकाऱ्यांची मिटिंग संपन्न.

कोल्हापूर :१७/२/२०२१
प्रतिनिधि :अतुल पाटील.
  

गेली कित्येक वर्ष भारतीय संघाच्या भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून शासन दरबारी विविध मागण्यासाठी निवेदने , मोर्चे  काढण्यात आले अहेत त्यामधील काही मागण्या मान्य झाल्या पण सरकार जाणूनबुजून काही मागण्या मान्य करण्यास कित्येक वर्ष लावत आहे . ज्या राहिलेल्या काही मागण्या आहेत त्याच संदर्भात भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात सुरक्षारक्षक पदाधिकारी यांची मीटिंग बोलवण्यात आली होती. 
या मिटींगमध्ये १४ मंडळ एकत्रीकरण झाले पाहिजे , खाकीवर्दी किंवा लष्करी दर्जाचा युनिफॉर्म मिळाला पाहिजे, पीएफ ऑफिसला जमा करण्यात यावा अशा काही अन्य मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते  ; पण अजूनही काही त्याचे उत्तर मिळाले नसल्याकारणाने पुढील काही दिवसात कोल्हापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय याठिकाणी खबरदार हे आंदोलन करण्यात येणार आहे.
 या मिटींगला भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दादा पाटील उपाध्यक्ष अतुल पाटील, राजू पाटील शिडवनकर मामा उत्तम व्हराबळे सागर सूर्यवंशी संग्राम पाटील अन्य काही पदाधिकारी मिटींगला उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments