योगेश कांबळे .
नंदगाव प्रतिनिधी : नंदगाव
ता- (करवीर ) येथे चौगले गटाचे श्री . भगवान कृष्णात चांभार यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी नरके गटाच्या सौ . मयुरी संग्राम नरके यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी (शिक्षण ) पंचायत समिती करवीर चे धनाजी आनंदा पाटील यांनी कामकाज पाहिले. सरपंच पदासाठी भगवान कृष्णा चांभार यांच्या नावासाठी मंगल बाळू चौगले या सूचक तर उपसरपंच पदासाठी मयुरी संग्रामसिंह नरके यांच्या नावासाठी रूपाली मदन चौगले या सुचक होत्या. सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामसेवक सुरेश हासुरे, प्रशासक किशोर भिमराव आयरे , मा .सरपंच शाबाजी कुराडे, मा.पो पा. भिमराव चौगले, बाळासो चौगले, पंचायत समितीचे सदस्य रमेश चौगले, सनी नरके ,ग्रामपंचायत कर्मचारी शामराव शिंदे व सर्जेराव कुराडे यांच्यासह ग्रामस्थ हि उपस्थित होते.
0 Comments