Ticker

6/recent/ticker-posts

प्रत्येक माणसात एक लीडर असतो.


लेख Adv.RAMAN KAMBLE
मोबाईल 9930533788
लीडर जन्म घेतात समाजाची प्रगती करण्यासाठी.
 समाजात बदल करण्यासाठी.
 अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्यासाठी.
एक प्रेरणादायी उदाहरण बनुन इतरांना  प्रोस्थान देण्यासाठी.
 मोठे उद्दिष्ट  प्राप्त करण्यासाठी.
माणसाला माणसातील श्रमता दाखवण्यासाठी.
प्रत्येक माणसामध्ये एक लीडर असतो आणि एक सामान्य माणूस असतो.

सामान्य माणूस म्‍हणजे जो परिस्थितीप्रमाणे स्वतःला ॲडजस्ट करतो. 
 प्रत्येक वेळी आपल्या पराभवाची जबाबदारी परिस्थितीवर  टाकत असतो .
पण लीडर तसा नसतो तो सामान्य माणसापेक्षा वर असतो तो परिस्थितीला दोष  देत नाही तो परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला जोरात टक्कर देऊन आपल्याला जे हवे ते मिळवत असतो आणि तो इतरांपेक्षा वेगळा असतो.

सामान्य माणसाला त्याच्या आयुष्यात लहानपणापासूनच समाधान मानण्याची प्रवृत्ती असते.  सामान्य माणसाला वयात आल्यानंतर एखादी नोकरी लागली की तो लग्न करतो एकदा घर घेतो आणि कुटुंबात सांभाळतो आपलं आयुष्य काढतो .
पण लीडरला बऱ्याच वेळा सामान्य माणसासारखी पटकन नोकरी लागत नाही. किंवा जरी लागली तरी  बरेच कष्ट घेतल्यानंतर लागते. त्याचे कारण त्याचा उद्दिष्ट मोठे  असते.आणि त्याच्या जीवनात पुढे जाण्यासाठी नेहमीच धडपड  असते म्हणून तो त्या उंच शिखरावर जाऊन इतरांच्या आधारास पात्र होतो . प्रत्येकाला वाटतं की मी तिथे हवा होतो. प्रत्येकाला वाटतं की मी एक यशस्वी माणूस असायला हवा.
 पण यशस्वी माणूस यशस्वी बनण्यासाठी बऱ्याच वेळा अपयश चाखावे लागते.
हे कित्येकांना माहीत नसतं जीवनात येणाऱ्या अनंत  त्रास  आणि अडचणी सगळ्यावर मात करून तो उभा असतो.

 अपयश आलं म्हणजे आपण न घाबरता आणि धीर न सोडता संकटांचा सामना केला पाहिजे आणि विजय मिळवला पाहिजे.

स्वतःला असे म्हटले पाहिजे की मी लीडर म्हणून जन्म घेतला आहे .
सामान्य माणूस म्हणून नव्हे त्यामुळे जीवनामध्ये अडचणी त्रास अपयश हे सर्व येणार आणि आपण त्या सर्वांना जोरात टक्कर देऊन आपल्याला हवं ते यश मिळवणार.

Post a Comment

0 Comments