Ticker

6/recent/ticker-posts

खेबवडे च्या उपसरपंचपदी श्री. सुयोग सुभाष वाडकर यांची बिनविरोध निवड तर सरपंच पदासाठी आरक्षित उमेदवार नसल्याने सरपंच पद रिक्त.

नंदगाव प्रतिनिधी : योगेश कांबळे.


नंदगाव प्रतिनिधी : खेबवडे ता- (करवीर ) येथे  श्री . सुयोग सुभाष वाडकर यांची  बिनविरोध  उपसरपंच पदी निवड करण्यात आली . तसेच येथे सरपंच पदाचे आरक्षण हे  अनुसूचित  जमाती या  वर्गासाठी आरक्षित होते. परंतु या वर्गातील  उमेदवारच नसल्यामुळे  सरपंच पद रिक्त ठेवण्यात आले.  व उपसरपंच पदासाठी  बंटी पाटील गटाचे  समर्थक सुयोग सुभाष वाडकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी सुयोग वाडकर यांच्या नावासाठी प्रदीप वसंत चौगले हे सुचक होते.    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब कोळी हे होते.  
यावेळी ग्राम विकास अधिकारी बशीर मुजावर, मा.सरपंच  सुभाष वाडकर  यांच्यासह किरण चौगले, निलेश शिंदे ,रेखा शिंदे, प्रेमा पाटील, संपत्ती बोगार ,आनंदा कुंभार, शुभांगी भाट  सर्व ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील  कुमार साबळे  संजय कांबळे  ग्रामस्थ व गावातील संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
.

Post a Comment

0 Comments