Ticker

6/recent/ticker-posts

*कोल्हापूर विकास आघाडीचा रविवारी संवाद मेळावा*पत्रकार- सुभाष भोसले


कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत हा लोकशाही तत्त्वप्रणाली प्रमाणे चालणारा देश असून भारतीय संविधानाचा आधार घेऊन या देशातील लोकशाही वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर एखादी निवडणूक बिनविरोध होणे स्वाभाविक असले तरी सरसकट बिनविरोधाची भाषा करणे लोकशाही तत्वाला आव्हान निर्माण करणारी आहे. 
वास्तविक एखाद्या मतदार संघातून निवडून आलेल्या प्रतिनिधींचे निधन होणे ही दुःखाचीच गोष्ट आहे. असे असले तरी त्या दुःखाचे व भावनेचे भांडवल करून लोकशाही तत्व प्रणालीवर गदा आणणे योग्य होणार नाही. लोकशाही बळकटीकरणासाठी ही धोक्याची घंटा आहे. निधनाचा भावनिक विषय करून घराणेशाहीला प्रोत्साहन देणे लोकशाहीसाठी घातक आहे. अशावेळी वारसांनाच पुढे आणण्याची नवी प्रथा निर्माण होत आहे. त्यांच्या दुःखात सर्वांनीच सहभागी होण्यास कोणतीही अडचण नाही. पण सत्ता कुटुंबात राखून ठेवणे हे इतर निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करणारे आहे. 
लोकशाहीची मूल्ये विस्कळीत होऊ नयेत, धनदांडग्याची मनमानी थांबावी, सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे ही भूमिका घेऊन सामान्य जनतेच्या बाजूचे राजकारण उभे करण्यासाठी त्यांच्या बाजूचा उमेदवार कोल्हापूर उत्तर मतदार संघात उभा करण्याचा निर्णय घेण्यासाठी विविध फुले, शाहू, आंबेडकरवादी व परिवर्तनवादी पक्ष, संघटनांची विचारविनिमय करण्यासाठी निवडक प्रतिनिधींचा रविवार दि. 6 फेब्रुवारी, 2022 रोजी दुपारी 4:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कॉन्फरन्स हॉल, कोल्हापूर येथे संवाद मेळावा आयोजित केला आहे. 
या संवाद मेळाव्याचे निमंत्रक लोकराज्य जनता पार्टीचे प्रमुख अनिल चव्हाण हे असणार आहेत तर मेळाव्याचे उदघाटन सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट अनिल म्हमाने हे करणार आहेत.
सत्यशोधक इतिहास परिषदचे प्रमुख डॉ. कपिल राजहंस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनील पाटील (नॅशनल ब्लॅक पँथर), डॉ. दयानंद ठाणेकर (महाराष्ट्र विकास आघाडी), अमोल कुरणे (परिवर्तन सामाजिक संस्था), संदीप कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (धर्मनिरपेक्ष)), रोहित चांदणे (फकिरा क्रांती दल), तर सन्माननीय उपस्थिती ऍड. अकबर मकानदार, सिध्दार्थ कांबळे, अमोल कांबळे, शशिकांत जाधव, देवेंद्र पटेकरी, सिताराम कारंडे, सुरेश जाधव, हिंदुराव पोवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नवं सामान्य जनतेच्या बाजूचं राजकारण उभं करू पाहणाऱ्या पक्ष, संघटना, व्यक्ती व संस्था यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक अनिल चव्हाण यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments