श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांचे वतीने घेण्यात आलेल्या शिक्षण महर्षी डॉ बापूजी साळुंखे वक्तृत्व स्पर्धेत विद्यालयाची इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी कुमारी सुहाना समीर नायकवडी या विद्यार्थिनीने कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग व बेळगाव जिल्ह्यातून तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवार दिनांक 21 /2/2022 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे संपन्न झाला बक्षीस वितरण संस्थेच्या सचिव सौ शुभांगी गावडे तसेच संस्थेचे आजीव सेवक व कोल्हापूर विभागाचे प्रमुख श्री श्रीराम साळुंखे , तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री मोहिते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी विविध शाखा वरून बक्षीस पात्र विद्यार्थी उपस्थित होते.
बक्षीस पात्र विद्यार्थिनी कुमारी सुहाना समीर नायकवडी या विद्यार्थिनीला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए. डी. जाधव तसेच श्री संजय शिंदे , श्री बाळासाहेब धोंगडे ,श्री आनंदराव फराकटे, सौ सुजाता पुरीबुवा श्री संभाजी पाटील श्री पोपटराव सातपुते या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments