सह्याद्री व्याघ्रप्रकल्प खाजगी शेतजमीन सर्व्हे न. ५८ व ६० चा सातारा जिल्हा प्रशासनाने दि.१/२/२०२१ रोजी मजूर केलेल्या प्रस्ताव व ठरावाची अंमलबजावणी करा. अथवा चुकीच्या प्रस्तवाला मजुरी देण्याऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करा
मौजे हुबरळी (धडवाड ) स्थित ता. पाटण येथील शेतकऱ्यांनी लोक कल्याण
साठी आपल्या सुपीक जमिनी कोयना धारणा साठी दिल्या. त्याच्या बदली वनविभागाच्या
जमीनि १९६५ साली महसूलविभागा कडे हस्तांतरित करून या धरणग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या गेल्या. काही कालावधीत व्याघ्रप्रकल्प प्रोजेक्ट राबवल्या मूळे जमीन कसणे ,म्हणजे जिव धोक्यात घालणे आशी स्थिती निर्माण झाली. या कारणाने शेतकऱ्यांनि मालकी हक्काच्या जमिनी नाईलाजाने वन विभागाला विकत देण्याचा प्रस्ताव तयार करून दिला.
या अनुषंगाने सातारा जिल्हा प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्याची जिल्हास्तरीय समितीचे बैठकीचे आयोजन करून दि.१/२/२०२१ रोजी सातारा जिल्हा प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी ठराव मंजूर केला आहे. पण मंजूर ठरावाची अंमलबजावणी झाली नाही.
या मजूर प्रस्तावा नंतर निर्वाणीकरणा चा मुद्दा सह्याद्री व्याघ्रप्रकल्प अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. जर निर्वाणीकरणाचा मुद्दा असताना सातारा जिल्हा प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्याच्या जिल्हास्तरीय समितीचे बैठकीचे आयोजन करून प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी जमिनीचा दर ठरवून खरेदी करण्याचा प्रस्तावास कोणता निकष ठेवून मजुर केला. जर हा ठराव बेकायदेशीर असेल तर हा चुकीचा प्रस्ताव बैठकित ठेवण्याऱ्या व हा ठराव मंजूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करा. हे निलंबन करणासाठी कोणत्याही चौकशीची गरज नसून दि.१/२/२०२१रोजी चुकीचा चुकीचा प्रस्ताव बैठकित ठेवण्याऱ्या व हा ठराव पास करून शेतकऱ्यांची व प्रशासनाची फसवणूक केलाचे सर्व दस्तऐवज जिल्हाधिकारी प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. ते तपासुन संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करा.अथवा दि.१/२/२०२२ रोजीच्या ठरावाची अंमलबजावणी करून खरेदीची प्रक्रिया तात्काळ सुरू करा.
आंदोलनाची व निवेदनाची गांभीर्याने,व संवेदनशील रित्या दखल घ्यावी ही विनंती करण्यात आली आहे . यावेळी उपस्थित
तुकाराम कांबळे ,राजीव सोरट ,
स्वप्नील कांबळे, अर्जुन कासे प्रकाश पाटील,
रवींद्र बनसोडे, रोहित जाधव संदीप कांबळे ,
शितल गवंडी रमेश देसाई आनंद देसाई आदी होते.
0 Comments