पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा नियमित करण्याबाबत निवेदन युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांच्या तर्फे आयुक्त राजेश पाटील साहेब यांना देण्यात आले व पाणी पुरवठा नियमित करण्या बाबत चर्चा केली.
निवेदनात असे नमूद केले की गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी पण पावसाचे प्रमाण चांगलं आहे परंतु मागील वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे . मागच्या वर्षी जानेवारी मध्ये पवना धरणात पाण्याची जी पातळी होती त्या पेक्षा या वर्षी पाण्याची पातळी जास्त आहे .
या वर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनही एक दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहोत ही बाब निश्चितच खेदजनक आहे .
जरी 24 तास पाणी पुरवठा करणं शक्यं नसेल तरी रोजच्या रोज पिंपरी-चिंचवड शहरात नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात यावा .
0 Comments