पत्रकार- सुभाष भोसले
*कोल्हापूर*: मराठीतील पहिले वृत्तपत्र 'दर्पण ' सुरू करणारे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून ६ जानेवारी रोजी साप्ताहिक गरुडभरारी च्या सानेगुरुजी वसाहत येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक साप्ताहिक गरुडभरारीचे मुख्य संपादक अनिल चव्हाण यांनी केले. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून 'आपलं उपनगरचे' संपादक उदय गायकवाड यांनी अभिवादन केले. कार्यक्रमास पत्रकार सुधाकर डोनोलीकर, करवीर निवासिनीचे संपादक सुनील कुंभार, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत निकम, सहसचिव अभय तळप,ओंकार कुरणे , संदीप मिठारी,भूषण गराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गव्हर्मेंट सव्हट बँकेच्या नूतन व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल संजय खोत यांचा शाल, गुच्छ व श्रीफळ देऊन विशेष सत्कार अनिल चव्हाण यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना अनिल चव्हाण यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची कर्तव्य व भूमिका खूप महत्त्वाची आहे असे विचार मांडले.याप्रसंगी संजय खोत व आपलं उपनगरचे संपादक उदय गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली. पत्रकार दिनाचे औचित्य साधून उपस्थित पत्रकारांना पेन, पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन सुधाकर डोनोलीकर यांनी केले.आभार प्रशांत निकम यांनी मानले.साप्ताहिक गरुडभरारी व स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments