Ticker

6/recent/ticker-posts

*उमेद ने दिली शिक्षणाची उमेद*श्री शाहू हायस्कूल, ज्यूनि कॉलेजमध्ये उमेद शिष्यवृत्तीचे वाटपपत्रकार- सुभाष भोसले


       कागल तालुक्यातील श्री शाहू हायस्कूल , ज्युनियर कॉलेज या ठिकाणी *उमेद शिष्यवृत्ती २०२१ चा शिष्यवृत्ती धनादेश वाटप कार्यक्रम* उमेद कागल तालुका शिष्यवृत्ती समन्वयक संदीप कुंभार , राजाराम पात्रे , विक्रम भाऊ म्हाळुंगेकर यांच्या ऊत्तम नियोजनाने छान झाला.

      या कार्यक्रमाला कागल नगर परिषद शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी सौ. सारिका कासोटे ,प्राचार्य श्री जे .डी. पाटील , उपप्राचार्य श्री बी के मडीवाळ,कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ.सुषमा पाटील उमेदीयन प्रकाश गाताडे ,नविनचंद्र सनगर , सौ स्वरादा संकपाळ , बंटी संकपाळ, कागल नगरपालिका केंद्राचे केंद्रप्रमुख श्री इनामदार तसेच कॉलेजचा सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.कु श्रेया व संकेत या दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेण्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी उमेद फाउंडेशनने शैक्षणिक मदतीचा धनादेश दिला तर कॉलेज मधील इतर दोन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणेत आले. उमेद फाउंडेशनने होतकरू विद्यार्थ्यानां मदत करून प्रेरणा दिल्याबद्दल सर्वत्र उमेद फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक होत आहे .

Post a Comment

0 Comments