राधानगरी तहसील कार्यालय मधील सार्वजनिक शौचालय मध्ये घाणीचे साम्राज्य;प्रशासनाचे दुर्लक्ष ?
राधानगरी तहसीलदार कार्यालय येथे सार्वजनिक शौचालय मध्ये घाणीचे साम्राज्य माजली असून शासकीय कामासाठी येणार्या लोकांची शौचालयाची गैरसोय होत आहे खास करून महिला वर्गासाठी येथे कोणतीही व्यवस्था नसून महिलांना अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे या घाणीचे साम्राज्य कडे शासकीय कर्मचाऱ्यांची पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून शौचालय मध्ये बाटल्यांचा ढीग लागलेला दिसून येत आहे व शौचालय शेजारी झुडपांची वाट पाहण्यात मिळते कार्यालयात येणाऱ्या शासकीय कामासाठी लोकांना या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्यामुळे शौचालयाची स्वच्छता व ती पुन्हा चालू करण्यासंदर्भात मागणी होत आहे.
या संदर्भात राष्ट्रीय विश्वगामी माहिती अधिकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुल पाटील आणि राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तसेच राधानगरी लाईव्ह चे संपादक सुनिल पाटील यांना ही बाब लक्षात येता त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यालयातील नायब तहसीलदार ,तहसीलदार सो यांना विचारले असता पाण्याची सोय उपलब्ध नाही व त्याची दररोज स्वच्छता करता येईल असा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही असे उत्तर दिले जाते शौचालयांची निगा राखता येत नसेल, पुरेसा कर्मचारीवर्ग नसेल,तसेच पाणी उपलब्ध नसेल तर ही शौचालये बांधलीच कशासाठी हा प्रश्न उपस्थित उपस्थित होतो. पुरुष वर्ग उघड्यावर जात आहेत तर महिला वर्गाला या समस्येला सामोरे जावे लागत आहे, याचे गांभीर्य मा. तहसीलदार यांनी घ्यावे आणि लवकरात लवकर सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करून वापरण्यास योग्य करावे अशा स्वरूपाचे निवेदन योगेश कांबळे (रयत कामगार संघटना महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख) तसेच अतुल पाटील,सुनिल पाटील, निलेश चौगले, तानाजी सदाशिव पाटील (तळगाव) आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.
0 Comments