Ticker

6/recent/ticker-posts

"जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान" अंतर्गत श्री शाहू हायस्कुल ज्युनिअर काॅलेज,कागल येथे विविध कार्यक्रम संपन्न.

"जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान" अंतर्गत 
श्री शाहू हायस्कुल ज्युनिअर काॅलेज,कागल येथे विविध कार्यक्रम संपन्न.
पत्रकार- सुभाष भोसले
कागल : दि. ०६/०१/२०२२ या सप्ताह निमित्त आमच्या कॉलेजमध्ये दोरी उड्या, केशभूषा, मेहंदी असा विविध स्पर्धा अतिशय उत्साहाने पार पडल्या. 
        या कार्यक्रमाचे उद्घाटन उपप्राचार्य बी.के. मडिवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले आहेत.मेंहदी स्पर्धेत प्रथम क्रमांक साक्षी तानाजी पाटील द्वितीय क्र. प्रणोती रंगराव कुंभार तृतीय क्रमांक साक्षी संजय ठाणेकर, दोरी उड्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सानिका जयराम पाटील, द्वितीय क्रमांक प्रियंका बाळू चौगुले, तृतीय क्रमांक निकिता भाऊसो सिद्धगोंडा त्याचबरोबर केशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक अस्मिता आण्‍णासो पाटील द्वितीय क्रमांक साक्षी किरण माने,तृतीय क्रमांक संध्यारानी गजानन लोहार या सर्व विद्यार्थींनीना यश प्राप्त झाले.
          या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापिका उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments