Ticker

6/recent/ticker-posts

**युवासंग्राम प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांच्या तर्फे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेब यांना राज्य परिवहन मंडळाच्या संपाबाबत निर्णय घेऊन सेवा पूर्ववत करणेबाबत निवेदन**

**युवासंग्राम प्रतिष्ठान  संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांच्या तर्फे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेब यांना राज्य परिवहन मंडळाच्या संपाबाबत निर्णय घेऊन सेवा पूर्ववत करणेबाबत निवेदन**



युवासंग्राम प्रतिष्ठान  संस्थापक अध्यक्ष मयुर पवार यांनी मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे साहेब यांना  राज्य परिवहन मंडळाच्या संपाबाबत निर्णय घेऊन सेवा पूर्ववत करणेबाबत निवेदन पाठवले व निवेदनात असे नमूद केले की ,राज्य परिवहन (S.T.) कर्मचाऱ्यांचा संप हा २ महिने होऊन गेले तरी चालूच आहे .यामुळे सामान्य नागरिकांचे प्रवासाचे अतोनात हाल होत आहेत.खाजगी वाहतूकदार हे मनमानी करीत अव्वाच्या सव्वा भाडे घेत आहेत . गरीब प्रवाशी हे अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत प्रवास करीत आहेत . काहीतरी तोडगा काढून व कर्मचाऱ्यांचे मन वळवून सेवा चालू करण्यात यावी ही सर्व नागरिकांची इच्छा आहे.

       सर्व नागरिकांच्या वतीने युवासंग्राम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संघटना आपणास विनंती करते कि , हा तिढा लवकरात लवकर सोडवून सामान्य प्रवाशांना न्याय द्यावा. रोज आशा असते कि आज तरी संप मिटेल परंतु पुन्हा निराशा प्रवाशांच्या पदरी पडत आहे.


           कर्मचारी वर्ग व शासन स्तरावर योग्य ती चर्चा चालू आहेच परंतु आम्ही चर्चेचा भाग नसल्यामुळे काही गोष्टी आम्हाला कळत नसल्या तरी शासन हे लोकहितासाठी प्रयत्न करत राहणारच हे माहित आहे, म्हणून आपणास जनतेच्या वतीने लोक हितासाठी  लवकरात लवकर तोडगा काढून सार्वजनिक वाहतूक चालू करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली.

Post a Comment

0 Comments