Ticker

6/recent/ticker-posts

साहित्यक्षेत्र एक गोरखधंदा ?

दि.१५/१२/२१
 साहित्यक्षेत्र एक सेवा म्हणून पाहिलं जातं आणि क्षेत्रात अनेक नामवंत प्रतिभावान सलेखक कवी कवयत्री होऊन गेले आजही आहेत यापुढेही होतील यात शंकाच नाही 
ते खरे खुरे साहित्य क्षेत्रातले जेष्ठ गुरुवर्य आपण समजतो ते 
त्यांच्या प्रतिष्ठा आणि लेखनामुळेच पण आजकाल याच साहित्य क्षेत्रात स्वतःला एक मोठे साहित्यिक समजणारे लोकं फक्त आपल्या प्रसिध्दीसाठी हापापले आहेत आणि एक धंदा बनला आहे असं वाटतं . त्यात या फेसबुकवर तर शेकडो साहित्य समूह आहेत 
त्यात अनेक समूह खरोखरच चांगले आहेत त्यांच्या विविध प्रकारच्या रचना वाचताना आनंद मिळतो . कांही ऑनलाईन कार्यक्रम घेऊन सणासुदीला एक वेगळ्या प्रकारची मैफिल रंगते . आणि नव नवीन लोकांना मार्गदर्शन करतात त्यातून या क्षेत्रात नवनवीन लोकं घडत आहे 
 याउलट एक एक समूह असे आहेत की फक्त नाव मोठं अन लक्षण खोटं तिथं अध्यक्ष प्रमुख पाहुणे आमंत्रित अतिथी पदापासून स्टेजवर बसणाऱ्या लोकांच्या कडून मोठं मोठ्या देणग्या घ्यायचा अन संम्मेलन करायचे असा धंदा चालवला आहे . बरं कोणत्याही कार्यक्रमात पैसा लागतोच हे मान्य पण कार्यक्रम झाल्यावर त्याची आणि संम्मेलनला आलेल्या लोकांनी नोंदणी फी दिल्यानंतर त्यांची उनीदुनी काढायची अगदी 
फुकटची गर्दी पासून त्याच्या जेवण्याखान्या पर्यंत काढायचे 
एखाद्या व्यक्तीला कांही अपरिहार्य कारणास्तव जर फि देता आली नाही आणि कार्यक्रमाला हजर होता आलं नाही तर तो फसवा ती फसवी आहे असा त्वरीत शिक्का मारून मोकळे व्हायचे . आपल्या मर्जीतील लोकांना विशिष्ट प्रकारे सन्मान करायचा आणि अगदी आमदार , नगरसेवक , समाजसेवक , विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडून देगणी म्हणून घ्यायची आणि त्यांचीच बदनामी करायची असे याची देही याची डोळा अनुभवले आणि मला पण या लोकांनी सोडले नाही हे आमच्या जुन्या मित्रमैत्रिणीच्या कडून समजले तेंव्हा तर धक्काच बसला . अजून एक गोष्ट एखादी कवयित्री आजारी असेल तर ती पती किंव्हा ईतर कोणाला घेऊन आली तर त्यांच्या एका जेवणाच्या ताटावरून चर्चा होते तेंव्हा मात्र 
स्वतःला नामवंत साहित्यिक समजणाऱ्या व्यक्तीची प्रतिभा लक्षात येते . आणि जर साहित्य संमेलनाचा कार्यक्रम असेल तर मग ईतर लोकांचा (आपल्या मर्जीतील लोकांचा ) सन्मान करण्यात येतो 
ते कांही योगदान दिले तर ठीक कमी दिले तर ते लोकं पण फुकटेच असतात अशी यांची मानसिकता यांची मग अशा लोकांना बोलवायचंच नाही ना . जे मान्यवर निमंत्रित असतात त्यांच्याबद्दल जर हे असं पाठीमागून चर्चा होत असेल तर जे स्वतःला खरे पत्रकार समजतात त्यांच्या बातम्या पण पेपरला व ईतर ठिकाणी द्या तुमचा सन्मान होतो म्हणून अशा गोष्टी नजरेआड करू नका . आणि लोकांच्या सहभागातून जो कार्यक्रम होतो त्याचा एकाच व्यक्तीच्या नावाने उदो उदो करू नका . असे अनेक अनुभव मी नवोदित कवी असून पण अनुभवले
आहेत माझ्या मित्रमंडळींनी पण 
अनुभवले आहेत अशा लोकांना या साहित्य क्षेत्रातील जेष्ठ मान्यवरांनी 
ओळखून या क्षेत्राला बदनाम होण्यापासून वाचवले पाहिजे 
असे मनापासून वाटतेय . अगदी 
समूह असो कलमंच असो तो शासनाच्या रजिस्टर मध्ये नोंद पासून दुसऱ्या एकादा रजिस्टर नंबर टाकून पैसा उकळण्यासाठी हा धंदा खोलला आहे तो बंद करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्र आले पाहिजे आणि यांचे खरे चेहरे लोकांच्या समोर आले पाहिजेत . 
अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला पुढे जाऊ देत नाही हि फार मोठी खंत आहे . हा माझा स्वानुभव आहे 

@ अवधुत शेलार @
        दिवा (ठाणे )

Post a Comment

0 Comments