Ticker

6/recent/ticker-posts

आता सन्मान लाव तुझ्या घरात भिंतीवर फ्रेमला लायटिंग लावून ..!

 आता सन्मान लाव तुझ्या घरात भिंतीवर फ्रेमला लायटिंग लावून ..!



       गेल्या रविवारी हे न्यूजपेपर साहित्य परिषद अंतर्गत गारगोटी येथे काव्यसंमेल झाले . इथे माझ्या सह या कार्यक्रमला महाराष्ट्र मधून आलेल्या लोकांचा उद्घटपणे बोलून अपमान केलाच आहे . पण विशेष म्हणजे या महाशयांनी आता स्वतःच्या बचावासाठी पत्रकारांना 

खोटी माहिती द्यायला चालू केली आहे . 

          मला आधी स्टेजवर साहित्य 

गौरव सन्मान दिला तो मी उपस्थित लोकांच्या निदर्शनास आणून दिला तेंव्हा तो मी परत केला कारण मला 

जाहीर झालेला सन्मान सामाजिक क्षेत्रातील होता तसा त्यांनी मला wp वर मॅसेज पाठवला . त्वरित एक फ्रेम आणून माझ्या हातात दिली व लगेच तो सन्मान परत घेऊन गेले हे सर्वांनी पाहिले तरी 

मी बाहेर पडेपर्यंत कांहीही उत्तर दिले नाही . मी त्यानंतर मी आयोजकांना चौकशी केली तेंव्हा आधी तुम्ही या कार्यक्रमात हजर का झाला नाही पासून आता कुठे आहेत आणून देतो पासून माझ्या घरापर्यंत पोहोचवतो अशी सावरा सावर करून उरली सुरली ईज्जत

वाचवायचा प्रयत्न केला तरी पण 

तो सन्मान तर सोडा हा माणूस

ईतका खोटे बोलतो कि माझ्या मित्र मंडळीसह मला निमंत्रण दिलेच नाही तेही एका वरिष्ठ पत्रकार यांना 

हा व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे खोटी माहिती देत आहे . मी स्वतः या माणसाशी अनेक वेळा बोललो 

माझी सर्व माहिती यांनी घेतली तेंव्हाच हा सन्मान जाहीर केला ना 

 कार्यक्रम नंतर परत कॉल करून पण तुम्ही यांना कसे ओळखता त्यांना कसे ओळखता अशी चौकशी केली मी त्यांना माझी ओळख दिलीय महाराष्ट्र मध्ये प्रत्येक तालुक्यात माझी मित्रमंडळी आहेत हे सुद्धा या महाशयांना सांगून पण मला व माझ्या मित्रांना सर्व बाजूनी ब्लॉक केले आहे यावरून सर्व साहित्य क्षेत्रातील वरिष्ठ गुरुवर्य मंडळीनी यावर नक्कीच विचार करण्याची वेळ आहे . आणि खरोखरच या काव्यसंमेल जी सत्य परिस्थिती 

जाणून भविष्यात अशा गोष्टीना 

आळा बसेल अशी ठोस पावले उचलून योग्य तो निर्णय घ्यावा .

जेणेकरून माझ्यासारख्या वाचक व नवोदित लेखक व्यक्तीचा या 

साहित्य क्षेत्रावरून विश्वास उडू नये 

हि माफक अपेक्षा .👏

या माणसाला स्वतःच्या प्रसिद्धीसाठी असा खोटा बुरखा घालून आणि तो मी नव्हेच असा लोकांसमोर वावरतो याचे नवल वाटते . दुसरे म्हणजे या माणसाने गारगोटी व आजूबाजूच्या स्थायिक लोकांना याबद्दल माहिती दिली नाही आणि दिली ती पण कांही मोजक्या लोकांना त्यांना 

पण सर्व अंधारात ठेवून याचा अर्थ माझ्या सारख्या नवोदित व्यक्तीने काय समजावा ? दिलगिरी तर सोडा पण आमच्याकडे असंच चालते हे उद्धटपणे सांगणे हे 

लक्षण नाही का ? मी एक रुपया दिला नाही म्हणून हा माझा सन्मान

 दिला नसेल हाच विचार माझ्या मनात का येऊ नये ? आणि नाही 

झेपत तर असे कार्यक्रम करू नका . हि कोल्हापूरकरांची संस्कृती 

नाही .

         निमंत्रण पत्रिकेततील कांही लोक उपस्थिती नव्हती आणि संम्मेलन अध्यक्ष का बदलले हे 

न समजण्या इतका मी दूधखुळा नक्कीच नाही . 

 

 आदरणीय माननीय सन्माननिय,

    श्री .कमलाकर साहेब ,

    मी शेतकरीपुत्र अवधुत बाबुराव         

    शेलार उर्फ ह.भ.प. अवधुत महाराज शेलार दिवेकर . 

 आपल्याला जाहीर आव्हान करतो 

कि आपला शाही सन्मान एक कोल्हापूरकर कसा करतात हे मी स्वतः दाखवतो ते पण ऐतिहासिक ठिकाणी आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यक्तीच्या हस्ते आणि 

नामवंत लोकांच्या उपस्थितीत 

 ठिकाण तारीख वेळ आपल्याला

मी स्वतः कळवतो फक्त तुम्ही 

माझा सन्मान स्वीकारण्यासाठी

 आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे 


विशेष : भुदरगड तालुक्यातील 

           पत्रकार बंधूनी हा तिथला कार्यक्रम शेवटचा असेल यापुढे या माणसाचा एकही कार्यक्रम होणार नाही अशी ग्वाही दिली आहे . 


@ अवधुत @

Post a Comment

0 Comments