निगडी ओटास्कीम भागात गेल्या अनेक वर्षापासुन भाडयाच्या घरात रहाणार्या अंध अपंग दिव्यांग बांधवांच पुनर्वसन करण्यात यावे
गेलीअनेक वर्षे निगडी ओटास्कीम भागात रहाणाऱ्या अंध अपंग दिव्यांग बांधवांना अजुनही स्वताच घर नाही, ओटास्कीम भागात सुमारे 300 ते 350 दिव्यांग बांधव भाड्याच्या घरात गेले अनेक वर्ष त्याठिकाणी वास्तव्यात आहेत, परंतु महापालिकेने खर्या गरजूंना घरापासून वंचित ठेवल्यांने अंध अपंग दिव्यांग बांधव आज उपासमारी करून तसेच काही बांधव सिग्नलवर उभे राहुन भिक मागुन आपले उपजिवीका भागवत आहेत,
महापालिकेने त्वरीत ह्या अंध दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनेत सहभागी करून त्या बांधवांना महापलिकेकडुन योग्य त्या सोयीसुविधा मिळवुन द्यावेत आशी मागणी मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश आहेर यांनी आपल्या पञाच्या माधयमातुन केले आहे,
महापालिका आयुक्त साहेब आपणांस हात जोडून विनंती करतो कि हया खर्या गर्जुंना त्यांच्या हाक्काच्या घराच स्वप्न आपल्या सारख्या प्रमाणिक अधिकार्यांच्या कालावधीत मिळावे हिच विनंती - गणेश आहेर
*आपला श्री गणेश आहेर*
संस्थापक अध्यक्ष मातोश्री सामाजिक संस्था
जिल्हा उपाध्यक्ष शिवसेना प्रणित महाराष्ट्र वितरक सेना
0 Comments