*कोल्हापूर :* लोकराज्य जनता पार्टीच्या पदाधिकारी निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यामध्ये कोल्हापूर जिल्हा सरचिटणीसपदी अमोल दयानंद कांबळे (रा. वाघवे),पन्हाळा तालुका कार्याध्यक्षपदी संतोष हिंदुराव खोत (रा.वेखंडवाडी), व पन्हाळा तालुका उपाध्यक्षपदी गोरक्ष बाजीराव पाटील (रा. आरळे) यांची निवड करण्यात आली.लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी या निवडी जाहीर केल्या. पक्षाची विचारधारा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नूतन पदाधिकाऱ्यानी योगदान द्यावे असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी याप्रसंगी केले.पक्षाच्या सानेगुरुजी वसाहत येथील कार्यालयात झालेल्या पदाधिकारी निवडीप्रसंगी पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments