Ticker

6/recent/ticker-posts

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब.

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात शेतकऱ्यानी अधिकाऱ्यांना विचारला जाब
पत्रकार:- सुभाष भोसले
  महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आज शेतकऱ्यांनी महावितरणच्या गारगोटी कार्यालयाच्या दारात ठीय्या मारून आधिकाऱ्यांना जाब विचारला.
    यावेळी वीजवीतरणच्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांनी विविध त्रुटींच्या प्रश्नांची सरबत्ती करुन अधिकाऱ्यांना भंडाऊन सोडले. यावेळी महावितरण कंपनीकडे खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले
१ ) अनेक शेतकऱ्यांची महापूर व 
      अतिवृष्टी काळात मोटर पंप, मीटर 
      पेट्या व पाईपलाईन बुडाल्या 
      आहेत व वाहून गेल्या आहेत तरी 
      सुध्दा त्यांना वीज बीले देण्यात
      आली आहेत ती माफ करणेत 
       यावीत..
२ ) सदरची बिले भरली नाहीत म्हणून
      आपण त्यांना कृषीपंपांच्या नवीन
       जोडण्या दिल्या नाहीत त्या 
       जोडून देणेत याव्यात.
३ ) कृषीपंपाच्या वीज बीलात सवलत 
      देऊन त्यांना बील भरणेसाठी हप्ते
      पाडून द्यावेत.
४ ) वीज बील भरले नाही म्हणून वीज 
     जोडणी देणार नाही हे धोरण रद्द 
     करून शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची 
      वीज जोडणी तात्काळ करावी.
५ ) ज्या शेतकऱ्यांची वीज मीटर बंद
      आहेत त्यांची वीज बीले सरासरी
      पद्धतीने न आकारता त्यांना 
      तात्काळ नवीन वीज मीटर देऊन
      त्या रीडींग प्रमाणे वीज बील
       आकारणी करावी.
६ ) कोरोना, अतिवृष्टी, महापूर यामुळे
      शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात 
      नुकसान झाल्यामूळे शेतकऱ्यांचे
      उत्पन्न पूर्णतः घटले आहे. त्यामुळे
      सध्या शेतकऱ्यांकडे बील
      भरण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत 
      त्यामुळे कृषी पंपधारकांची सक्तीने
      करण्यात येत असलेली वीज बील
      वसुली थांबवावी.
७ ) अनेक गावातील ट्रान्सफार्मर पेट्या
      खराब आहेत, त्या पेट्यात फ्युज    
      बॉक्स नाहीत, अनेक पोल 
      वाकलेले आहेत, अनेक ठिकाणी
      कमी उंचीचे पोल आहेत, अनेक
      ठीकाणी विद्युत वाहिण्या 
      झाडांमध्ये अडकल्या आहेत तर
     अनेक ठिकाणी विद्युत वाहीण्या 
     लोंबकळत आहेत त्या त्वरीत 
     दुरुस्त कराव्यात. त्यामुळे जिवीत 
     अथवा वित्तहानी झाल्यास त्याची
     जबाबदारी आपणावर राहील याची 
      नोंद घ्यावी.
८ ) ज्या शेतकऱ्यांना विजजोडणी दिली नाही पण बिले दिली आहेत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
९ ) मीटर रीडींग न घेता बीले पाठवणाऱ्या मीटर रीडरचा ठेका रद्द् करून त्यांना काळ्या यादीत टाकावे.
    यावेळी नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, संतोष पाटील,प्रकाश पाटील, नामदेव चौगले, रणजित आडके, सुनिल तेली, बाजीराव देसाई, भगवान शिंदे,राहुल चौगले, शक्तीजीत पोवार,भिमराव भंडारी, शामराव पाटील, बाळासाहेब कुपटे, निवास भंडारी, भास्कर तेलंग, शामराव पाटील, दत्तात्रय पोवार, धनाजी पाटील, रविंद्र पाटील, दिगंबर कुंभार, मानाजी पोवार,गजराज पाटील, धनाजी पोवार, पांडूरंग पोवार , शिवाजी पोवार, भास्कर पोवार, प्रकाश पोवार, कृष्णात तेलंग, डी.जी .गूरव, धोंडीराम कुंभार,नामदेव पाटील आनंदा भांदिगरे,आदी शेतकरी मोठया संखेने उपस्थीत होते. यावेळी भुदरगड पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला..

Post a Comment

0 Comments