Ticker

6/recent/ticker-posts

आदरणीय ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन च्या सचिव पदी कुरुंदवाडचे सुपुत्र प्रा.दिलीप सुतार यांची अभिनंदनीय निवड.

 


कुरूंदवाड-दि.18-अब्दुल लाट चे सुपुत्र भारताचे माजी परराष्ट्र सचिव,राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य *आदरणीय ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन च्या सचिव पदी कुरुंदवाडचे सुपुत्र प्रा.दिलीप सुतार यांची अभिनंदनीय निवड.*


महाराष्ट्र व देश पातळीवर मानवीहक्कांचे रक्षण संवर्धन व जात पात धर्म पंथ विरहित समस्त मानव जातीचे कल्याण या उदात्त हेतूने प्रेरित आदरणीय मुळे यानी चांगूलपणाच्या चळवळीची (MovementOf Positivity )सुरूवात केली आहे...याच चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन च्या वतीने देशभर युवक युवती व देशवाशीयांच्या मनांत सकारात्मकता रूजविण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या सामाजिक सांस्क्रुतिक शैक्षणिक,साहित्यिक विधायक उपक्रमांचे आयोजन करणेत येते...!


या फौ़डेशनच्या कार्याविषयी माहिती देताना प्रा दिलीप सुतार म्हणाले..." आजवर या फौंडेशन च्या वतीने महापूर भूकंप व कोरोना काळात आपत्ती ग्रस्ताना व दूर्गम भागातील आदिवासी बंधूभगिनीना विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, युवकासाठी विविधप्रकारच्या स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन... दिल्ली व परिसरातील काही विद्यापीठात सकारात्मकता (Syllabus Of Positivity) अभ्यासक्रम सुरू करणेसाठी खास प्रयत्न तसेच विविध प्रकारच्या ललितकला साहित्य वाचन संस्क्रुती व व्यक्तीमत्व विकास , भारतीय संविधान विषयक जनजागरण तसेच पर्यावरणपूरक,सेंद्रीय शेती ग्रामीण व शहरी महिला सबलीकरणार्थ उद्योग व्यवसाय,इ.क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या प्रत्यक्ष गाठीभेटी...मुलाखती अशा छोट्यामोठ्या 350पेक्षा अधिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन करणेत आले आहे... 

यासर्व विधायक उपक्रमांचा हेतू एकच...की मानवी संवेदना व सद्भावनेने प्रेरित स्वातंत्र्य समता बंधूता न्याय व धर्मनिरपेक्षता ही मानवी मुल्ये जिवापाड जपणारी एक नि:स्वार्थ, निरपेक्ष स्वावलंबी कर्तव्यदक्ष देशप्रेमी युवक युवतींची व जबाबदार नागरीकांची समर्थ साखळी देश विदेशात निर्माण व्हावी... व हे विश्वची माझे घर हे केवळ स्वप्नरंजन न राहता ते सर्वांच्या सकारात्मक आचार विचारसरणीतून प्रत्यक्ष साकार व्हावे...ही या चांगुलपणाच्या चळवळीचे कर्णधार ज्ञानेश्वर मुळे यांची व्यापक संकल्पना आहे...!!!"


*अशा एका उदात्त हेतूने कार्यरत फौंडेशनच्या सचिव पदी 2021/2022अशा दोन वर्षासाठीआपली निवड करून आपल्याला मानवसेवेची एक खूप चांगली संधी प्राप्त करून दिल्याबद्दल त्यानी आदरणीयज्ञानेश्वर मुळे यांचे हार्दिक आभार मानले..व आपल्याला मिळालेल्या या संधीचा आपण ही चळवळ सर्वदूर पोहचविण्यासाठी व अधिक बळकट व्यापक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.*


एक प्रामाणिक साहित्यिक ,कवी, पुरोगामी सामाजिक कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या प्रा.दिलीप सुतार यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतूक होत आहे.

Post a Comment

0 Comments