पत्रकार- सुभाष भोसले
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद चे सहकार्य ने व बीड जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य पैलवान गृपच्या वतीने बीड येथे प्रथमच मराठवाडा केसरी महिला कुस्ती स्पर्धा आयोजीत केल्या आहेत, रविवारी छत्रपती संभाजी राजे महाराज क्रींडागंणावर स्पर्धाचे उदघाटन झाल्यानंतर रंगलेल्या सामन्यातील रोमहर्षक क्षण पाहण्यासाठी क्रीडांप्रेमीनी मोठी गर्दी केली होती...
दंगल सारख्या चित्रपटांमधून अभिनेता आमिर खान यांनी मुलीच्या कुस्तीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला.. ५ डिसेंबर रोजी शहरात राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या ,यामधे ३०० कुस्तीपटु मुलींनी सहभाग घेतला, औरंगाबाद च्या श्रृती बामनावत या मुलीने चांदीची गदा आणि रोख ३१ हजार रुपये चे बक्षीस पटकावले, तर समिक्षा पवार उपविजेता ठरली, महाराष्ट्र राज्य पैलवान गृपच्या वतीने राज्यात पहिल्यांदाच बीडमध्ये मुलींच्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यासाठी पैलवान गृप मराठवाडा संपर्क प्रमुख पै जब्बार शेख, उज्वल गायकवाड, अभिजित तांदळे,भारत गिरी,प्रा अमृत ठाकुर, यांनी पुढाकार घेतला, दिवसभर चाललेल्या या सामन्यात नगराध्यक्ष डॉ भारतभूषण आणि त्यांचे धर्मपत्नी डाँ दिपाताई हे आवर्जून उपस्थित होते... अर्जून पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय किर्तीचे कुस्तीपटु मा पै राहुल आवारे सर, डिवायसपी, पुणे, हिंदकेसरी दीनानाथ सिंग, पैलवान गृप चे प्रदेश अध्यक्ष पै मारोती भाऊ जाधव, पैलवान गृप च्या महिला प्रदेश अध्यक्षा सौ कविता ताई कोळी ,धुळे ,प्रेमलता ताई जाधव, धुळे, यांची प्रमुख उपस्थिती होती...बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध कुस्तीवीर बाळासाहेब आवारे, हे प्रमुख पाहुणे म्हणून आणि पंच म्हणून उपस्थित होते ,या कुस्ती स्पर्धा दंगल स्वरूपाचे असल्याने सहभागी स्पर्धकांना आपल्या इच्छेनुसार जोडीदार निवडता आले, प्रतेक कुस्ती मधे जी मुलगी निवडेल तीला रोख बक्षीस देण्यात आली, स्पर्धेमधील मुलींना तिरुमला गृपकडुन युनिफॉर्म भेट दिले त्यामुळे खेळाडूंचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला.
0 Comments