Ticker

6/recent/ticker-posts

कृषी पंप धारकांच्या अडचणी सुटणार तरी कधी ?.. शेतकरी यांना वाली आहे का कोणी..?

कृषी पंप धारकांच्या अडचणी सुटणार तरी कधी ?.. शेतकरी यांना वाली आहे का कोणी..?

  राधानगरी लाईव्ह,
विषेश

   भारत देश हा कृषी प्रधान देश मानला जातो पण यात शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा सुटणार तरी कधी ? एकीकडे महापूराने शेतकऱ्यांचे नुकसान तर दुसरीकडे महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना कृषी पंपाचे चुकीच्या पद्धतीने दिली जाणारी भरमसाठ वीज बीलं....यामध्ये शेतकऱ्याला वाली आहे का कोणी असा सवाल शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
(निवेदन वाचून दाखवताना जिल्हा अध्यक्ष अतुल पाटील)
    आज राधानगरी तालुका उपकार्यकारी अभियंता भोसले साहेब यांना जन सेवार्थ फाऊंडेशन संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनात चुकीच्या पद्धतीने भरमसाठ व अंदाजे बिले दिली जातात ती बिले कमी करण्याचे काम शाखा अभियंत्यांचे असताना पण शाखा अभियंता यांच काम नको खुर्चीत बसून फक्त पगार घ्यायला पाहिजे असे आहे की काय ? म्हणून तेच काम शेतकऱ्यांना वीज बिल कमी करण्यासाठी तालुक्याला हेलपाटे मारावे लावतात. HP पंप धारकांना जादा HP ची बिले दिली जातात, शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जावर कोणतीच प्रतिक्रिया नाही,फॉल्टी मीटर बदलली जात नाहीत,बऱ्याच ठिकाणी फ्युज नसुन  डायरेक्ट कनेक्शन केलेली आहेत अशा काही इतर तक्रारीं व मागण्यांबाबत आज राधानगरी तालुका उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले ,तसेच विषेश बाब म्हणजे प्रत्येक विभाग नुसार कृषी पंप धारक शेतकरी व त्या विभागात असणारे कर्मचारी यांचा सोशल मीडिया ग्रुप करून सुचना व माहिती यांची देवाण घेवाण केली जावी अशी मागणी पण केली आहे.
(शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना संपादक सुनिल पाटील)

   राधानगरी उपकार्यकारी अभियंता हे शाखा अभियंता यांना काय सूचना देतात त्या सूचनांचे शाखा अभियंता पालन करतील काय ? शेतकरी यांची चुकीच्या पद्धतीने दिलेली विज बीलं दूरुस्त करुन बरोबर असणारी विज बीलं शेतकऱ्याला देतील काय ? तसेच चुकीच्या पद्धतीने भरमसाठ दिलेली विज बीलं यांला जबाबदार कोण आणि  त्या जबाबदार असणाऱ्यांवर उप कार्यकारी अभियंता हे काय निर्णय घेतील ? काय आले निवेदन गेले गठ्यात असे होतय...त्यासाठी या निवेदनाची एक प्रत माहितीसाठी मा.आमदार साहेब यांना देण्यात येणार आहे.

 आज हजर असणाऱ्या शेतकऱ्यांचे तातडीने प्रश्न मार्गी लावले पण जे आजही सहा सहा महिने हेलपाटे मारतात त्या शेतकऱ्यांचे प्रश्न वेळेवर सोडवले जातील काय ? का परत त्यांनाही हेलपाटे मारावे लावतील? आता तर एसटी सेवा ही बंद आहे तरी देखील आपली चुकीची बीलं दुरुस्त करण्यासाठी व इतर तक्रारींसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहेत,यावर गांभीर्याने विचार करून राधानगरी तालुक्याचे आमदार मा.आबिटकर साहेब व संबंधित विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी योग्य तो निर्णय घ्यावा व याकडे सर्व राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
                       (उपस्थित शेतकरी)
उपस्थित शेतकरी यांचे म्हणने असे आहे की,आम्हाला मिटर रिडींग प्रमाणेच वीज बील आकारा कारण पावसाळ्याचे चार महिने पंप बंद असतात तरीही तेवढेच बिल येते आणि उन्हाळ्यात आमच्या विहिरी कोरड्या ठणठणीत असतात तरीही तेवढेच बिल दिले जाते, आमच्या डीपी वरील मेंटेनन्स हा महावितरणने केला पाहिजे कारण ती त्यांची जबाबदारी आहे,असे विविध प्रश्न मांडले. आणि यावर योग्य तो निर्णय घेऊ असे उपअभियंता यांनी सांगितले.

यावेळी जन सेवार्थ फाउंडेशन संचलित माहिती अधिकार कार्यकर्ता समितीचे महाराष्ट्र राज्य राज्य सदस्य सुनिल पाटील,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अतुल पाटील तसेच युवा पत्रकार संघटनेचे राधानगरी तालुका अध्यक्ष शिवाजी गोरूले,प्रसाद हुपरीकर तसेच इतर पदाधिकारी व राधानगरी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
   यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता समितीचे महाराष्ट्र राज्य सल्लागार शफिक तांबोळी तसेच अशोक जुगदार यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments