पत्रकार: सुभाष भोसले
लोकराज्य जनता पार्टीच्या पन्हाळा तालुका उपाध्यक्षपदी गोरक्ष बाजीराव पाटील (रा.आरळे) यांची निवड करण्यात आली.लोकराज्य जनता पार्टीच्या साने गुरुजी वसाहत येथील मुख्य कार्यालयात पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी निवडीचे पत्र व स्मृतिचिन्ह देऊन गोरक्ष पाटील यांचा सत्कार केला.यावेळी पक्षाचे कोल्हापूर दक्षिण सरचिटणीस देवेंद्र पटेकरी, कोल्हापूर शहर संघटक शशिकांत जाधव, अशोक चव्हाण, आनंदा चव्हाण,सर्जेराव भोसले,अशोकराव माळी,राजेंद्र यादव,काकासाहेब भोकरे,अशोक तोरसे,अशोक पाटील,सुरेश पाटील, सुनील कुंभार आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे असे आवाहन पक्षाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले.
0 Comments