Ticker

6/recent/ticker-posts

*श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये पालक सभा संपन्न.**विदयार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भूमिका महत्वाची- डॉ जी . बी . कमळकर, गटशिक्षणाधिकारी कागल* पत्रकार- सुभाष भोसले


श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागल येथे शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेची पालक सहविचार सभा गटशिक्षणाधिकारी श्री जी . बी .कमळकर , प्राचार्य, उपप्राचार्य, पालक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. कागल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री जी.बी.कमळकर , प्राचार्य जे. डी. पाटील , उपप्राचार्य बी. के. मडिवाळ , माता-पालक अश्विनी मुरतले , पिता-पालक बाबासाहेब आवटे यांचे हस्ते प्रतिमा पूजन झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एम. एच. सुतार यांनी केले. कार्यक्रमासाठी उपस्थित गटशिक्षणाधिकारी श्री जी बी कमळकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांच्या बरोबर आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना संस्कार मिळणे महत्त्वाचे आहे. याबाबत मनोगत व्यक्त केले.पालक प्रतिनिधी श्री आवटे व श्री मुद्दाण्णा यांनी विद्यार्थी हे मोबाईलचा अतिवापर कसा करतात आणि त्यांना त्यापासून कसे परावृत्त केले पाहिजे, शिक्षक-पालक जबादारी, कर्तव्य याबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जे. डी. पाटील यांनी पालकांशी हितगूज केले. ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख उपप्राचार्य बी. के. मडिवाळ यांनी शिक्षक-पालक जबाबदारी, कॉलेजची परंपरा कशी टिकून आहे याबाबत मनोगत व्यक्त केले. तसेच कला-वाणिज्य विभागातील प्रा. व्ही. एल. शिंदे , प्रा. एन.सी सोनवणे ,प्रा. आर.एस.पाटणे , प्रा. एस. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. व्ही. जी. घोरपडे यांनी आभार मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन्. एन्. गिरी यांनी केले.

Post a Comment

0 Comments