Ticker

6/recent/ticker-posts

आता जमीन परत दिल्याशिवाय शांत बसतच नाही . भाईसाहेब जाधव

महार वतनी जमीन  स्थानिक गावगुंडांनी हाडफ केल्या प्रकरणी मुळशी येथे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब  जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोंड तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करण्यात आले .
     गावातील बड्या गावगुंडांनी कवडीमोल भावाने गावातील गरीब / असाह्य , दुर्बल लोकांच्या जमनी ह्या पैशाच्या आणि  गुंडगिरी जोरावर बळकावल्या आहेत परिणामी ह्या गरीब लोकांना आपल्या हक्कच्या जमिनी पासून अलिप्त राहावे लागले आहे . या जमिनी त्यांना मिळवून देण्यासाठी भाई साहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन , निवेदन करून परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून जो प्रयत्न त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळत नाहीत तो पर्यंत शांत बसणार नाही असे भाई साहेब यांनी म्हटले आहे .
यावेळी उपस्थिती पश्चिम महाराष्ट्र उपा.नरेंद्र मोरे , महा.राज्य प्रव.विजय जाधव , रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील भाई जाधव, कोल्हा. जि.अध्य.विश्वास कांबळे , पुणे जिल्हा .अध्यक्ष अशोक शेख , पुणे शहर अध्यक्ष सोमनाथ साळवी , प्रदीप भावू  गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments