के.डी.सी.सी. बँकेची निवडणूक ताकतीने लढवणार – आमदार प्रकाश आबिटकर
भुदरगड तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळींची बैठक संपन्न
राधानगरी लाईव्ह न्युज
सुनिल पाटील
कोल्हापुर जिल्हा बँकेची निवडणुकीची प्रारुप यादी प्रसिध्द झाली असुन जिल्हा बँक निवडणूकीमध्ये योग्य नियोजन केल्यास आपण यशस्वी होऊ शकतो. प्रत्येक निवडणूकीमध्ये राजकीय संदर्भ हे बदलत असतात त्यामुळे काळी मंडळींना स्वत:ची मक्तेदारी असल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे तालुक्यातील बँकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा बँकेची निवडणुक ताकतीने लढवणार असल्याची घोषणा आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते गारगोटी येथे के.डी.सी.सी. बँकेच्या निवडणूकीच्या प्रार्श्वभूमीवर आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आम्ही ताकतीने लढवणार असुन तालुक्यातील सर्वसामान्य शेतक-यांच्या घामाने उभा राहीलेल्या विकास सोसायटयांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल रहाणार आहोत. आपल्या विचाराचा जिल्हा बँकेतील तालुक्याचा प्रतिनिधी निवडण्याकरीता सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे अवाहन केले.
यावेळी जेष्ठनेते बी.एस.देसाई आण्णा म्हाणाले की, जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरु झाली असुन आपल्या गटाकडुन जिल्हा बँकेचा निवडणुकीमध्ये सर्वसमावेशक असा उमेदवार देण्यात यावा. विकास सोसायटयांच्या माध्यमातुन शेतक-यांचे विविध प्रश्न सोडविता येतात परंतु अनेक वर्षापासुन शेतक-यांचे प्रश्न व विकास सेवा संस्थांचे कामकाज फार प्रभावीपणे झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नवीन विचाराचा उमेदवार निवडुण देणे गरजेचे आहे.
बिद्रीचे माजी संचालक के.जी.नांदेकर म्हणाले की, जिल्हातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका गेली 2 वर्षे कोरोनामुळे पुढे ढकल्याण्यात आल्या होत्या. परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे सर्वच निवडणुकांची सुरवात झाली आहे. गोकुळच्या निवडणुकीमध्ये ज्या पध्दतीने सर्वांनी एकदिलाने काम केले तशाच पध्दतीने जिल्हा बँकेची निवडणुकीमध्ये सर्वांनी ईर्शेने काम करुन भुदरगडची जिल्हा बँकेची निवडणुक यशस्वी करा असे सांगितले.
यावेळी, कोल्हापुर जिल्हा शेतकरी संघाचे माजी संचालक सुर्याजी देसाई (नाना), बाजार समितीचे संचालक कल्याणराव निकम, शिवेसना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी सभापती बाबा नांदेकर, विदयाधर परीट यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत व प्रासताविक राहुरी कृषी विदयापिठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्ताजीराव उगले यांनी केले.
यावेळी बैठकीस गोकूळ संचालक नंदकुमार ढेंगे, बाळासाहेब भोपळे, अशोक भांदीगरे, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, माजी सभापती पांडूरंग पाटील (पापा), अंकूश चव्हाण, युवानेते संदीप वरंडेकर, केमीस्ट असोसिएशन अध्यक्ष शिवाजीराव ढेंगे, मदनदादा देसाई, बाजीराव चव्हाण उपसभापती अजित देसाई, पं.स.सदस्य सुनिल निंबाळकर, धैर्यशिल भोसले-सरकार, प्रविण नलवडे, सुर्याजी देसाई, तात्या पाटील मुदाळ, सरपंच श्रीधर भोईटे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख उपस्थित होते
0 Comments